कोरोनाच्या दुसर्या लाटेत ‘इतके’ पट जास्त मृत्यू झाले
आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा तडाखा अधिक बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्यूचं प्रमाण 2020च्या 9 महिन्यांच्या तुलनेत 2021च्या पहिल्या 5 महिन्यांत 2 ते 4 पट अधिक होतं. गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 70 ते 38 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. तिथे पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोना मृत्यूच्या प्रमाणात 267 […]
ADVERTISEMENT
आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा तडाखा अधिक बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्यूचं प्रमाण 2020च्या 9 महिन्यांच्या तुलनेत 2021च्या पहिल्या 5 महिन्यांत 2 ते 4 पट अधिक होतं. गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 70 ते 38 टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. तिथे पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोना मृत्यूच्या प्रमाणात 267 टक्के आणि 263 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
गडचिरोली
गडचिरोलीमधील मृत्यूचं प्रमाण मागील वर्षी 87 होतं, ते आता यावर्षी 316वर पोहोचलंय. कोरोना रुग्णसंख्याही दुसऱ्या लाटेत 125 टक्क्यांनी वाढली.
हे वाचलं का?
नंदुरबार
नंदुरबारमध्ये मृत्यूचं प्रमाण 169 इतकं होतं. पण आता ते वाढून 621वर पोहोचलंय. कोरोना केसेसही तीन पट वाढल्या आहेत. 2020मध्ये इथल्या कोरोना केसेस 8,193 होत्या. मात्र आता दुसऱ्या लाटेत हे प्रमाण 30, 336 झालंय.
ADVERTISEMENT
लसींचा तुटवडा का जाणवतो? त्यामागचं ‘हे’ आहे सत्य
ADVERTISEMENT
आदिवासींमध्ये कोरोनाची भीती अधिक होती. ते चाचण्यांना, घरातल्यांपासून दूर जाण्याला घाबरायचे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकले नसल्याचं प्रमाण अधिक असल्याचं जाणकार सांगतात.
पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तरी पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक होती हे आकडेवारी सांगते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी 21 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यूदर दोन्हीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं.
राज्यात मागील वर्षी 19.32 लाख इतकी रुग्णसंख्या आढळली होती. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण 36.69 लाखांवर पोहोचलं. पण मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातलं मृत्यूचं प्रमाण मात्र कमीच होतं असं आकडेवारी सांगते. यावर्षी आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार 39,691 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला, मागच्या वर्षी हे प्रमाण 49,521 इतकं होतं. हा कल वाढलेल्या 21 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांमध्ये मृत्यूदरात 100% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातला Lockdown कायम राहणार आहे पण.. जाणून घ्या काय म्हणाले राजेश टोपे?
चंद्रपूर
विदर्भातल्या चंद्रपुरात मृत्यू दरात 3 पटींची वाढ झाली. रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली. 2020मध्ये 23,245 वर असलेली इथली रुग्णसंख्या वाढून 61,390 वर पोहोचली. तर मृत्यूचं प्रमाणही 389 वरून 949 वर पोहोचलं. पण मृत्यू दर मात्र 1.55 टक्के कमी झाला.
अमरावती
जिथून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली तिथेही मृत्यूचं प्रमाण 381 वरून दुसऱ्या लाटेत 951वर पोहोचली. कोरोना केसेसही 66,351वर पोहोचले. इतर जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, वाशिम, गोंदिया, वर्धा, नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्येही कोरोना मृत्यूत वाढ झाल्याचं दिसून आलं.
अमरावतीप्रमाणेच इतरही काही जिल्ह्यात मृत्यू आणि कोरोना केसेसच्या दोन लाटा येत असल्याचं चित्र आहे. 2 ते 3 आठवड्यांच्या फरकाने कधी मृत्यू संख्या वाढते तर कधी रुग्णसंख्या वाढते ही चिंताजनक बाब आहे. काही जिल्हे अजूनही कोरोनातून सावरण्याच्याच प्रयत्नात आहेत असं अभ्यासक सांगतात.
या व्यतिरिक्त जर शहरी महाराष्ट्राचा विचार केला तर, मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये मृत्यूदरात घट झालेली पाहायला मिळाली, ग्रामीण भागात मात्र स्थिती गंभीर होती.
मुंबई, ठाणे आणि पुणे
मुंबईत कोरोना केसेस 2.93 लाखांवरून 4.04 लाखांवर पोहोचल्या, मृत्यूचं प्रमाण 11,116वरून कमी होऊन 3,497 वर पोहोचलं.
ठाण्यातही मृत्यूचं प्रमाण 55,577 वरून कमी होऊन 2,385 वर पोहोचलं.
पुण्यातही मृत्यूचं प्रमाण 7,767 वरून कमी होऊन 3,730 इतकं नोंदवलं गेलं.
याचा अर्थ कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी आवश्यक जागरुकता, आरोग्य यंत्रणा यांची ग्रामीण भागात कमतरता आहे. तिच तिसऱ्या लाटेत भरून काढणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT