महाराष्ट्रात Corona मृत्यूदर घटला आहे… पण मृत्यू नाही.. हे आहे कारण
15 सप्टेंबरला राज्यात 515मृत्यू एका दिवसात झाले होते. तर त्या दिवशी महाराष्ट्रात 20 हजार 482 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. 1 मार्च 2021 ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. तसंच मृत्यूंचं प्रमाणही वाढलं आहे. सप्टेंबर 2020आणि एप्रिल महिन्यातले पाच […]
ADVERTISEMENT
15 सप्टेंबरला राज्यात 515मृत्यू एका दिवसात झाले होते. तर त्या दिवशी महाराष्ट्रात 20 हजार 482 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. 1 मार्च 2021 ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. तसंच मृत्यूंचं प्रमाणही वाढलं आहे. सप्टेंबर 2020आणि एप्रिल महिन्यातले पाच दिवस यांचा जर तुलनात्मक विचार केला तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतली परिस्थिती भयंकर आहे हे लक्षात येतं.
ADVERTISEMENT
गेल्या वर्षी काय होती परिस्थिती आणि आता काय आहे स्थिती?
सप्टेंबर 2020 मध्ये 20 हजार 482 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले होते तर 515 रूग्णांचा मृत्यू झाला होता.
हे वाचलं का?
1 एप्रिल ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत कोरोना मृत्यूंची संख्या झाली आहे 1384
5 एप्रिल या एका दिवसात 47 हजार 288 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर 155 मृत्यूंची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात 24 मार्च ते 31 मार्च या कालावधीत रूग्ण संख्या 2 लाख 79 हजारांनी वाढली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील मृत्यूदर हा चिंतेचा विषय नाही असं वक्तव्य हे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही केलं होतं. तसंच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केलं होतं. मात्र मृत्यूदर हा कमी झाला असला तरीही चाचण्या वाढल्या असल्याने तो दर कमी झाला आहे. टक्केवारीत कमी भासत असलेला मृत्यूदर हा चिंतेचा विषय आहे. एप्रिल 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीत मृत्यू दराचं सरासरी प्रमाण काय होतं त्यावर एक नजर टाकू..
‘या’ एका कारणामुळे पुण्यावर ओढावली ‘मिनी लॉकडाऊन’ची वेळ!
15 सप्टेंबर 2020 या दिवशी महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले होते. ती संख्या होती 515. या कालावधीत चाचण्या 1 कोटीही झालेल्या नव्हत्या. आता 2 कोटींपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. 1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीत 1384 मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची ही संख्या नक्कीच चिंता वाढवणारी ठरते आहे.
सप्टेंबर 2020 या संपूर्ण महिन्यात कोरोना रूग्णसंख्येचा आणि मृत्यूंचा आलेख चढताच राहिला. त्यानंतर कमी होत गेला.. मात्र 1 फेब्रुवारी 2021 ते 5 एप्रिल 2021 या काळात पुन्हा एकदा कोरोना रूग्णही वाढले आणि मृत्यूही. महाराष्ट्रात 1 फेब्रुवारी 2021 ते 5 एप्रिल 2021 या कालावधीत 4 हजार 953 मृत्यू झाले आहेत. म्हणजेच 2 महिने पाच दिवसांच्या कालावधीत झालेले मृत्यू हे जवळपास पाच हजारांच्या जवळ जाणारे आहेत.
आता आपण नजर टाकुयात सप्टेंबर महिन्यापासून हे मृत्यू कसे वाढत गेले त्यावर
15 सप्टेंबर 2020 515 रूग्णांचा मृत्यू
30 सप्टेंबर 2020 पर्यंत राज्यात एकूण 36 हजार 662 मृत्यू
ऑक्टोबर 2020 या महिन्यात ही संख्या 43 हजार 911 इतकी झाली
ऑक्टोबर 2020 या महिन्यात 7 हजार 662 जणांचा मृत्यू झाला
1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 3 हजार 240 जणांचा मृत्यू झाला
सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत 47 हजार 151 रूग्णांचा मृत्यू झाला.
1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत 2370 मृत्यू महाराष्ट्रात झाले.
सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ही 49 हजार 521 इतकी झाली होती.
1 जानेवारी 2021 या दिवशी 59 मृत्यूंची नोंद झाली होती. तर सप्टेंबर 2020 ते १ जानेवारी 2021 या कालावधीत मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या 49 हजार 580 इतकी झाली.
जानेवारी 2021 या महिन्यात 1 हजार 561 इतक्या रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
सप्टेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत रूग्णांच्या मृत्यूंची संख्या ही 51 हजार 80 इतकी झाली
फेब्रुवारी महिन्यात 1074 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली तर सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ही 52 हजार 154 वर येऊन पोहचली.
1 ते 31 मार्च 2021 या महिन्यात कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची संख्या 2495 इतकी झाली, तर एकूण रूग्णांच्या मृत्यूंची संख्या ही 54 हजार 649 वर जाऊन पोहचली.
1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीत 1384 मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. तर आत्तापर्यंत राज्यात एकूण 56 हजार 33 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना लस घेताना आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्याल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या महितीनुसार 5 एप्रिल 2021 पर्यंत राज्यात 2 कोटी 7 लाख 15 हजार 793 नमुने तपासण्यात आले आहेत. ज्यापैकी एकूण 30 लाख 57 हजार 885 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 25 लाख 49 हजार 75 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 56 हजार 33 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्याच्या घडीला राज्यात मृत्यूदर हा कमी झाला असला तरीही चाचण्यांचं प्रमाण वाढलं आहे. राज्यात 2 कोटींपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत आणि गेल्या पाच दिवसांमध्ये 1384 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आता हे प्रमाण आणखी वाढत राहिलं तर ते आटोक्यात आणण्याचं नवं आव्हान सरकार समोर असणार आहे. लोकांनी काळजी योग्य ती काळजी घेतली नाही आणि जर कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर तातडीने चाचणी केली नाही तर त्यामुळे मृत्यू वाढतील आणि मृत्यूदर हा कागदावर जरी कमी दिसत असला तरीही वास्तवातली स्थिती भीषण असेल यात काही शंका नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT