आता घरच्या घरीच करता येणार कोरोना चाचणी, ICMR ची होम बेस्ड कोव्हिड टेस्टिंग किटला मंजुरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: आपल्याला कोरोनाची (Corona) लागण झालेली आहे की नाही हे आतापर्यंत अँटीजेन (Antigen) किंवा आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR Test) केल्यानंतर समजत होतं. अँटीजेन चाचणीचा रिपोर्ट हा अवघ्या अर्ध्या तासात मिळतो. तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल हा 24 तासानंतर समजतो. परंतु आता कोरोना चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किट (Home based covid testing kit) मंजूर करण्यात आले आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या तपासाला वेग येईल आणि लोकं घरबसल्या आपल्याला कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे तपासू शकतात.

ADVERTISEMENT

कोरोना महामारीच्या दरम्यान आत आपण कोव्हिड-19 तपासणी स्वतः घरी करू शकता. आयसीएमआरने (ICMR)कोव्हिडसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मान्यता दिली आहे. हे एक होम रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले असल्यास आपण घरबसल्या या कीट द्वारे टेस्ट करु शकता. त्यामुळे आपल्याला कोरोनाची लागण झालेली आहे की नाही हे आपल्याला तात्काळ समजू शकणार आहे.

होम बेस्ड टेस्टिंग किट्सची अधिक चाचणी करण्याची शिफारस केलेली नाही. आयसीएमआर व्यतिरिक्त डीसीजीआयनेही बाजारात होम बेस्ड टेस्टिंग किट विक्रीस मान्यता दिली आहे. पण, हे टेस्टिंग किट त्वरित बाजारात उपलब्ध होणार नाही, व्यापकपणे उपलब्ध होण्यासाठी यास थोडा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

तुम्हाला काळजी वाटतेय तुमच्या फुप्फुसांची ? तर मग ही चाचणी करा

आयसीएमआरने कोरोनाची चाचणी करण्यासाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिल्यानंतर आता कोरोनाची चाचणी करणं सोपे होणार आहे. सध्या भारतात मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स लिमिटेड (Mylab Discovery Solutions Ltd)या एका कंपनीलाच हे टेस्टिंग किट बनविण्याची मान्यता देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

होम टेस्टिंग मोबाइल अॅप गुगल प्ले स्टोअर आणि Apple स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. सर्व यूजर्स ते डाउनलोड करू शकतात. मोबाइल अॅप चाचणी प्रक्रियेसाठी एक विस्तृत मार्गदर्शक आहे, जो आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निकाल देईल. Mylab Covisself असे या अ‍ॅपचे नाव आहे.

ADVERTISEMENT

चीनचं जैविक शस्त्र आहे कोरोना? हाती आलेल्या गुप्त माहितीनुसार अमेरिकेने केला दावा..

विशेष म्हणजे या टेस्टिंग किटमुळे आपल्याला कोरोनाबाबत किमान प्राथमिक अंदाज लावता येणार आहे. जर आपली टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपण त्यावर तात्काळ उपचार घेऊ शकतात. ज्यामुळे पुढील धोके टळण्याची शक्यता अधिक आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे? आहारात या वस्तूंचा समावेश नक्की करा

याबाबत आयसीएमआरने असेही म्हटले आहे की, अँटीजेन चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट येणाऱ्यांना आता आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी लोक अँटीजेन चाचणीनंतर देखील लोक आरटीपीसीआर चाचणी करुन घेत होते. पण आता यापुढे त्याची फारशी गरज भासणार नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT