सिनेमा आणि मालिकांना कोरोनाचा फटका; 15 दिवस शूटिंग राहणार बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

sकोरोनाचे रूग्ण वाढत असताना महाराष्ट्र सरकारने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या रूग्ण संख्येचा मालिका आणि सिनेमांवरही परिणाम झाल्याचं दिसतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या बंदीच्या निर्णयावर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स एसोसिएशन, चॅनेल्स आणि गिल्ड फ़ेडेरेशन याची बैठक झाली. या बैठकीदरम्यान 15 दिवस मालिका आणि सिनेमांचं शूटींग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

ADVERTISEMENT

मुंबईमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेता नाईट कर्फ्यूनंतर आता 15 दिवसांसाठी शूटींगही बंद होणार आहे. यामध्ये फिल्म इंड्स्ट्रीचे 11 करोड रूपये फसले असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे 11 सिनेमांची प्रदर्शन थकलं असून मुंबईत 25 हून अधिक मालिकांच्या शूटींवर परिणाम होणार आहे.

शूटींग करायचे असेल तर हे नियम पाळावेच लागणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्मात्यांच्या बैठकीत दिले सक्त आदेश

हे वाचलं का?

या एकत्रित झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिण्यात आलं. या पत्रामध्ये काही अटी आणि प्लॅन तयार केला जावा जेणेकरून शूटींग सुरु होऊ शकेल. दरम्यान यामधील खाली दिलेल्या काही प्रस्तावांवर विचार केला जात असल्याची माहिती आहे.

-पोस्ट प्रोडक्शन चालू राहूद्या. कारण सिरियल, चित्रपट आणि वेब सिरीजचं शूटिंग यापूर्वीच झाले आहे. आणि हे काम सर्व नियमांद्वारे सुरू आहेत.

ADVERTISEMENT

-गरिबांना मदत करण्यासाठीच्या सरकारी योजनेत मीडिया आणि एंटरटेन्मेंटमधील ज्युनियर कलाकारांचा समावेश असावा.

ADVERTISEMENT

-मुंबई फिल्म सिटी आणि मीरा भाईंदरच्या सर्व शोच्या सेटवर प्रत्येकाला लस द्यावी.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT