जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कानपूर: कोविड (COVID-19) ची तिसरी आता लाट जवळपास संपली आहे. कोरोना संसर्गाची झपाट्याने घटणारी रुग्णसंख्या पाहता आता लोकांनाही दिलासा मिळाला आहे. पण कोरोनाचा धोका संपूर्णपणे टळला असे अजिबात नाही. IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की जूनच्या महिन्याच्या मध्यात किंवा अखेरीस कोरोनाची चौथी लाट येऊ शकते.

ADVERTISEMENT

IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनानंतर हा इशारा दिला आहे. संशोधनात एक सांख्यिकीय मॉडेल वापरण्यात आले आणि त्याचे परिणाम सूचित करतात की पुढील लाट ही सुमारे चार महिन्यांपर्यंत टिकू शकेल.

या संशोधनानुसार, समोर आलेला डेटा सूचित करतो की, भारतात कोविड-19 ची चौथी लाट उपलब्ध प्रारंभिक डेटाच्या तारखेपासून 936 दिवसांनी येईल. आणि ही तारीख होती 30 जानेवारी 2020.

हे वाचलं का?

22 जूनच्या आसपास चौथी लाट सुरू होऊ शकते

संशोधनानुसार, भारतात कोव्हिडची चौथी लाट ही 22 जूनच्या आसपास सुरू होऊ शकते आणि ऑगस्टच्या मध्यात किंवा अखेरीस त्याच्या शिखरावर पोहोचू शकते. तथापि, भारतातील या लाटेची तीव्रता व्हायरसच्या नेमक्या व्हेरिएंटचे स्वरूप आणि कोव्हिड लसीकरणाच्या स्थितीवर अवलंबून असेल.

ADVERTISEMENT

व्हेरिएंट दोन वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकताता सर प्रकारे दिसू शकतो

ADVERTISEMENT

आणखी एका अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की कोव्हिडचा पुढील व्हेरिएंट दोन वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतो. तसेच, नवीन व्हेरिएंट हा आधीच्या व्हेरियंटपेक्षा कमी तीव्र असेल की जास्त याची कोणतीही हमी नाही.

Covid-19: महाराष्ट्रातून कोरोना जवळजवळ हद्दपार, कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

सिएटल येथील फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटरचे व्हायरोलॉजिस्ट जेसी ब्लूम म्हणतात की, ‘ओमिक्रॉन वाढतच जाईल, अशी पहिली शक्यता आहे/ ज्याने काही प्रकारचे ओमिक्रॉन-प्लस प्रकार तयार केले असावे, जे BA.1 किंवा BA.2 पेक्षाही अधिक वाईट असू शकतो. आणखी एक शक्यता अशी आहे की नवीन व्हेरिएंट देखील येऊ शकतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने अलीकडेच इशाका दिला आहे की ओमिक्रॉन हा शेवटचा कोव्हिड व्हेरिएंट असू शकत नाही आणि पुढील व्हेरिएंट हे देखील अधिक संसर्गजन्य असू शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT