महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात कोरोनाचा कहर, पाहा कुठे-कुठे पुन्हा लागू करण्यात आला कठोर लॉकडाऊन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रातील शहरी भागात कोरोनाचे रुग्ण हळूहळू कमी होत असल्याचं आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे अनेक ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे आता काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. अशावेळी तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

जाणून घेऊयात कोणकोणत्या जिल्ह्यात कशापद्धतीचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.

उस्मानाबादमध्ये 5 दिवसांचा जनता कर्फ्यू

हे वाचलं का?

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने व राजकीय पक्षांसह विविध संघटनेच्या कडक लॉकडाऊनच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 8 मे ते 13 मे या काळात 5 दिवसांचा जनता कर्फ्यूचे लेखी आदेश जाहीर केले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत.

8 मे सकाळी 7 ते 13 मे सकाळी 7 या 5 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ सुरू राहतील असे आदेश देण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा, दवाखाने, लसीकरण, औषधी दुकाने, टॅक्सी ऑटोरिक्षा व सार्वजनिक बसेस वाहतूक, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा, पेट्रोल पपं, एटीएम, विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा या सुविधा सुरू राहतील, या जनता कर्फ्यू काळात भाजीपाला, फळ विक्री, किराणा दुकान, बेकरी व इतर आस्थापना दुकाने बंद राहतील.

ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेस फायदा होणार असून रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दररोज 700 ते 800 रुग्ण सापडत असून 10 ते 15 जणांचा मृत्यू होते आहे.

ADVERTISEMENT

उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाउन करावा अशी मागणी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, फुंक संघटनेचे अध्यक्ष एम डी देशमुख सचिव धर्मवीर कदम यांच्यासह अनेक संघटना व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली होती त्याची दखल घेत 5 दिवसांचा जनता कर्फ्यू आदेश जारी केले आहेत.

अमरावतीमध्ये 7 दिवस कडक लॉकडाऊन

अमरावती (Amravati) जिल्हात कोरोना रुग्णांचा स्फोट होत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कठोर भूमिका घेत येत्या रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून 15 मेपर्यंत पूर्णपणे कडक लॉकडाऊन (Strict Lockdown) जाहीर केला आहे. या काळात मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे.

यावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमरावती प्रशासनाने कंबर कसली आहे. आता जे लोक विनाकारण बाहेर फिरणार त्यांच्या गाड्या जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. तसेच किराणा दुकाने, भाजीपाला बंद राहणार असून शासकीय कार्यालये सर्व सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

तसेच या काळात पूर्वीप्रमाणे 25 माणसांच्या उपस्थितीत लग्न समारंभाला परवानगी नसणार आहे. फक्त 10 लोकांच्या उपस्थितीत अगदी घरच्या घरी लग्नसोहळा उरकावा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनला सहकार्य करा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

वाशिम जिल्ह्यात 15 मेपर्यंत मेडिकल, हॉस्पिटल वगळता सर्व दुकानं राहणार बंद!

वाशिम जिल्ह्यात 9 मे रोजीच्या दुपारी 12 वाजेपासून ते 15 मे रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. तसेच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत.

त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. तसेच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी आदी दुकाने, तसेच खाद्यपदार्थांची सर्व दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह), सर्व प्रकारची मद्यागृहे, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील.

तथापि, या सर्व दुकानांना सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबतचे नियोजन शहरी भागात संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व ग्रामीण भागात संबंधित गट विकास अधिकारी यांच्या स्तरावरून होणार आहे. दूध संकलन व घरपोच दूध वितरण सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत करता येईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT