Video : पुण्यात कपलने हद्दच पार केली…भररस्त्यात वाहतूक थांबवून रोमान्स
व्हायरल व्हिडिओमध्ये एक कपल भररस्त्यात रोमान्स (Couple Romance) करताना दिसले.प्रेमात आकंठ बुडून कसलीही पर्वा नसल्यागत हे कपल रोमान्स करत होते.या रोमान्सचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
Couple Romance in Road Stopping Traffic : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ हे अपघाताचे असतात, तर काही डान्स, कॉमेडी अथवा रोमान्सचे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ प्रंचड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल भररस्त्यात रोमान्स (Couple Romance) करताना दिसले.प्रेमात आकंठ बुडून कसलीही पर्वा नसल्यागत हे कपल रोमान्स करत होते.या रोमान्सचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (couple romance in stopping traffic video viral in social media)
ADVERTISEMENT
व्हिडिओत काय?
व्हायरल व्हिडिओत(Video Viral) रस्त्यावर सिग्नल लागलं आहे. या सिग्नलअभावी अनेक गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत आणि सिग्नल उघडण्याची वाट पाहात आहेत. त्यामुळे मोकळ्या झालेल्या रस्त्याचा फायदा घेत एका कपलं (Couple Romance) आपंल साधून घेतलं आहे. कपलने मोकळा रस्ता पाहून रस्त्याच्या मधोमध एकमेकांची गळाभेट घेतली आहे. ही कपल गळाभेट करण्यात इतकं आकंठ बुडालं होतं की त्यांना आवरण्यासाठी नागरीकांना गाडीतूर बाहेर यावे लागले होते.
हे ही वाचा : युट्यूबरचा नादच खुळा, महिला वेटरला का दिली लाखो रुपयांची ‘ही’ टीप?
कपलं (Couple Romance) इतकं घट्ट गळाभेत घेतेय की त्यांना सिग्नल संपलाय, गाड्यांना जाण्यासाठी रस्ता खाली करायचाय, याचे भान देखील उरले नाहीए. त्यामुळे सिग्नल संपताच कपल रस्त्यातून बाजूला होत नसल्याचे पाहून वाहतूक पोलिस आणि इतर नागरीक रस्त्यावर येतात आणि त्यांचा रोमान्स थांबवतात.बघता बघता खुपच गर्दी जमते, आणि या जोडप्याला रस्ता सोडायला लावतात. विशेष म्हणजे अनेकदा असे कपल सापडल्यास नागरीकांकडून त्यांना मारझोड करून हाकलण्यात येते मात्र या घटनेत त्यांना सरळ सोडून देण्यात आले आहे.
हे वाचलं का?
दरम्यान हा व्हिडिओ एका व्यक्तीने रस्त्याच्या कडेवरून शुट केला आहे.त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ पुण्याचा असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओवर तुफान लाईक्स आणि कमेंट्स येतात.
पुणे शहरात हे काय सुरु आहे, भररस्त्यात दोघांचा बिनधास्त रोमान्स#Pune #ViralVideo #Love pic.twitter.com/xuWPJbLDhh
— jitendra (@jitendrazavar) March 31, 2023
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रया
फक्त रोमान्सचे (Couple Romance) व्हिडिओ काढण्यापेक्षा दोन कानाशिलात मारुन व्हायरल करायला हवे होते, असे मत एका युझरने व्यक्त केले आहे. तर शुटींग सुरु आहे, सर्वे आर्टीस्ट असल्याचे दुसऱ्या युझरने म्हटलेय. तिसऱ्या युझरनेही असेच मत व्यक्त केले आहे.शुटींग सुरु आहे, पोलीस मराठी आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांना अद्दल घडवायला पाहिजे होती असे मत व्यक्त केले होते. तसेच काही नेटकऱ्यांनी सार्वजनिक स्थळी अशी कृत्य करण्याची आवश्यकता आहे का? असा सवाल उपस्थित केला.
हे ही वाचा : मच्छर मारणाऱ्या कॉईलने घेतला एकाच कुटुंबातील 6 जणांचा जीव, नेमकं काय घडलं?
दरम्यान सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. तसेच याआधी एका नवरा-बायकोचा गाडीवरचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.या व्हिडिओत नवऱ्याची सिगारेटची तपल बुझवण्यासाठी महिला सिगारेट हातात पकडते आणि नवरा गाडी चालवताना सिगारेट ओढतो. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT