सच्चा कलाकार हरपला, ‘कोर्ट’ सिनेमातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनाने निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचं आज (मंगळवार) पहाटे निधन झालं. नागपूरमधील एम्स रुग्णालयात पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ‘कोर्ट’ या राष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या सिनेमात वीरा साथीदार यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आपल्या संयत अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारा हा अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

ADVERTISEMENT

गेल्या आठवड्यातच वीरा साथीदार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर नागपुरातील एम्स रुग्णालयात उपचार देखील सुरु होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्रकृती अधिक खालावली. अखेर काही वेळाने त्यांची प्राणज्योत मालवली.

कामगार चळवळीचा बुलंद आवाज शांत! दत्ता इस्वलकर यांचं निधन

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जाणून घ्या वीरा साथीदार यांच्याविषयी थोडक्यात:

वीरा साथीदार यांच्या ‘कोर्ट’ या सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारवर मोहोर उमटवली होती. एवढंच नव्हे तर हा सिनेमा थेट ऑस्करसाठी देखील नॉमिनेट झाला होता. याच सिनेमात वीरा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. चळवळीतील एका बंडखोर कार्यकर्त्याची त्यांनी भूमिका बजावली होती. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी या भूमिकेत अक्षरश: जीव ओतला होता. या भूमिकेमुळेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिनय क्षेत्रात विशेष ओळख मिळाली.

ADVERTISEMENT

लहान वयातच लोक कला आणि संगीताची आवड असलेले वीरा साथीदार हे एक सच्चे कलाकार होते. त्यांनी साहित्याची देखील रुची होती. तसेच त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचाही मोठा पगडा होता. त्यामुळे अनेकदा आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्याविषयी व्यक्त होत असत. ते एक उत्कृष्ट लेखक सुद्धा ते होते.

ADVERTISEMENT

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन

प्रत्येक संभाव्य क्षेत्रात वीरा यांनी स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न केला. कला, साहित्य, चळवळ, अभिनय या क्षेत्रात वीरा यांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. त्याच्या निधनाने कला, साहित्य,अभिनय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT