Weekend Lockdown च्या दिवसांमध्येही राज्यात ५५ हजाराच्या वर नवे रुग्ण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉ़कडाउनची घोषणा केली. ब्रेक द चेन नियमांतर्गत कडक निर्बंध लागू करुनही राज्यातली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाहीये. काल रात्री ८ वाजल्यापासून राज्यभरात विकेंड लॉकडाउनला सुरुवात झाली. यानंतर आज दिवसभरात संपूर्ण राज्यात ५५ हजार ४११ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. हवेच्या वेगाप्रमाणे कोरोनाचा प्रसार होतोय, राजेश टोपेंनी व्यक्त […]
ADVERTISEMENT
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉ़कडाउनची घोषणा केली. ब्रेक द चेन नियमांतर्गत कडक निर्बंध लागू करुनही राज्यातली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाहीये. काल रात्री ८ वाजल्यापासून राज्यभरात विकेंड लॉकडाउनला सुरुवात झाली. यानंतर आज दिवसभरात संपूर्ण राज्यात ५५ हजार ४११ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
ADVERTISEMENT
हवेच्या वेगाप्रमाणे कोरोनाचा प्रसार होतोय, राजेश टोपेंनी व्यक्त केली ही भीती
आज दिवसभरात ३०९ जणांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. सध्या राज्याचा मृत्यूदर हा १.७२ टक्के इतका आहे. दिवसेंदिवस परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे राज्य सरकारसमोरील अडचणींमध्ये भर होताना दिसत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यात आता लॉकडाउन लावण्याशिवाय पर्याय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातली वाढती रुग्णसंख्या पाहता आताच कठोर निर्णय घेणं गरजेचं असल्याचं बोलून दाखवलं, “आताच लॉकडाउन लावला तर परिस्थिती महिन्याभरात नियंत्रणात येईल. लॉकडाउनशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाहीये. येणाऱ्या १५-२० दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल. त्यामुळे लॉकडाउन जाहीर करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. सध्या कोरोनाची साखळी मोडणं गरजेचं आहे.” लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यावर नियंत्रण मिळवायचं असल्यास लॉकडाउन लावण्याची हीच वेळ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.
पुणे : महाराष्ट्राला लसीची कमतरता भासणार नाही – प्रकाश जावडेकरांचं आश्वासन
ADVERTISEMENT
सध्या होत असलेला विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लॉकडाउन हाच एक योग्य पर्याय असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत पुन्हा एकदा सांगितलं. त्यामुळे सर्वपक्षांनी एकमताने याबद्दल निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधल्या घटकपक्षांनीही यावेळी मुख्यमंत्र्यांना आपला पाठींबा दर्शवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं असल्याचं सांगितलं. तसेच कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आताच कटू निर्णय घेण्याची वेळ आली आहे, हे निर्णय आताच घेतले तरच परिस्थितीवर नियंत्रण येऊ शकतं. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य तो पर्याय निवडावा असं थोरात म्हणाले. दरम्यान अशोक चव्हाण यांनीही लॉकडाउनला पाठींबा दर्शवत फक्त घोषणा करत असताना गरीबांचा विचार करुन मधला रस्ता काढावा अशी विनंती केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT