मुंबई विमानतळावर आलेल्या 861 प्रवाशांपैकी 3 कोरोना पॉझिटिव्ह -राजेश टोपे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ओमिक्रॉन व्हेरिएंट जगातील विविध देशांमध्ये धडक दिली असून, भारतातही प्रवेश केला आहे. कर्नाटकात दोन कोरोना रुग्णांना ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे केंद्रासह सर्वच राज्यातील सरकारं सतर्क झाली आहेत. महाराष्ट्रातही खबरदारी घेतली जात असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.

ADVERTISEMENT

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘राज्यात अद्याप कोविड-19 विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने बाधित झालेला एकही रुग्ण नाही. मात्र, याबाबत राज्य शासन सतर्क असून या व्हेरियंटच्या चाचण्या करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रयोगशाळा विकसित केल्या जात आहेत.’

Omicron आणखी २३ देशांमध्ये पसरला, व्हेरिएंटचा आणखी प्रसार होऊ शकतो – WHO ची माहिती

हे वाचलं का?

‘कोविड विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत राज्यातील मुंबई विमानतळावर येणाऱ्या 861 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 3 प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या 28 नागरिकांचे अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत,’ अशी माहिती टोपे यांनी दिली.

‘मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालय, प्रयोगशाळा तसेच पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे याबाबतचे काम सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या महाविद्यालयात जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा आहेत. काही शासकीय दवाखान्यात अशा प्रकारच्या प्रयोगशाळा विकसित करण्याबाबत विचार सुरू आहे’, असंही आरोग्यमंत्री म्हणाले.

ADVERTISEMENT

Omicron : साऊथ अफ्रिका, झिंबाब्वे, बोट्सवानामधून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली

ADVERTISEMENT

‘ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना अनुरुप वर्तणूक पाळण्यावर भर द्यावा. लशीचे दोन्ही डोस घ्यावेत. राज्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 80% आहे. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस घ्यावेत,’ असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

‘कर्नाटकात ओमिक्रॉन व्हेरियंटची बाधा झालेले दोन नागरिक आढळले आहेत. त्यापैकी पहिल्या नागरिकांचे संपर्कातील 200 आणि दुसऱ्या नागरिकांच्या संपर्कातील 175 जणांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल अद्याप आलेले नाहीत. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतरच ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच हाय रिस्क देशांबाबत काय निर्बंध लावायचे, याबाबत निर्णय घेतला जाईल’, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT