लातूरच्या शॉपर्स स्टॉपमध्ये बेवारस अवस्थेत आढळलं कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन
लातूरच्या शॉपर्स स्टॉपमध्ये बेवारस अवस्थेत कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन आढळलं आहे. देशात कोरोनाचा कहर कमी होतो आहे. अशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. दक्षिण अफ्रिकेतला अॅमिक्रॉन व्हेरिएंट हा चिंतेचा विषय ठरतो आहे. अशात कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन बेवारस अवस्थे आढळलं आहे. लातूर शहरात व्हॅक्सिनचा साठा आणि बॉक्स बेवारसपणे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. हा बॉक्स लातूर येथील शॉपर्स […]
ADVERTISEMENT
लातूरच्या शॉपर्स स्टॉपमध्ये बेवारस अवस्थेत कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन आढळलं आहे. देशात कोरोनाचा कहर कमी होतो आहे. अशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. दक्षिण अफ्रिकेतला अॅमिक्रॉन व्हेरिएंट हा चिंतेचा विषय ठरतो आहे. अशात कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन बेवारस अवस्थे आढळलं आहे.
ADVERTISEMENT
लातूर शहरात व्हॅक्सिनचा साठा आणि बॉक्स बेवारसपणे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. हा बॉक्स लातूर येथील शॉपर्स स्टॉप दुकानाच्या पायऱ्यावर वॉचमनला मंगळवारी रात्रीला आढळून आला आहे. या वॉचमनने याची माहिती वीर योद्धा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत रांजणकर यांना दिली आहे. सदरील घटनास्थळी रांजणकर स्वतः येऊन पाहणी केली असता कोव्हिशिल्ड लसीच्या बॉटल आणि त्या ठेवण्यासाठी वापरले जाणारे आईस बॉक्स बेवारस आढळून आले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT