Crime: शिव्या दिल्या अन् जीव गमवला, थरकाप उडवणारी घटना

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ulhasnagar Murder Case: उल्हासनगर: शिवीगाळ करणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीची दोन मित्रांनी मिळून धारधार शस्त्राने हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगर (Ulhasnagar) शहरातील बालकंजी बारी शाळेजवळ घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (Crime) दाखल करून स्थानिक पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास करून दोन्ही आरोपीना 12 तासातच बेड्या ठोकल्या आहेत. पप्पू उर्फ पपडया जालीदंर जाधव (वय 36 रा. बालकंची बारी, खेमानीरोड, उल्हासनगर) अमित रमेश पांडे (वय 30 रा. महालक्ष्मी प्लॉस्टजेट कंपनी, एम.आय.डी.सी.रोड, अंबरनाथ ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अशोक शामराव वाघमारे (वय 35) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (35 year old youth was killed out of anger over abuse both accused were arrested within 12 hours)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व मृतकांमध्ये दोन दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून शिवीगाळ झाली होती. याचाच राग मनात धरून आरोपीने अशोकला मारण्याचा कट रचला होता. रात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर तीन भागातील बालकंजी बारी शाळेजवळ अशोक वाघमारे हा उभा असतानाच दोघा आरोपींनी अचानक येऊन त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्याला जागीच ठार केलं आणि त्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला होता.

अशोकच्या खुना प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असतानाच 19 फेब्रुवारी रोजी उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांना गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा लागला होता.

हे वाचलं का?

Nalasopara Crime: क्रूर! लिव्ह इन पार्टनरची हत्या, बेडमध्ये लपवला मृतदेह

त्या आधारे पुणे येथील वाकड परिसरात आरोपी वास्तव्य करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर महाजन, अर्जुन मुत्तलगिरी ,मिलींद मोरे,पिंट्या थोरवे आणि निलेश अहिरे या पोलीस पथकाने सापळा रचून पप्पू उर्फ पपडया या आरोपीला ताब्यात घेतले.

ADVERTISEMENT

विवाहित प्रेयसीला आधी मंदिरात नेले नंतर तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले

ADVERTISEMENT

त्यानंतर दुसरा आरोपी अमित हा अंबरनाथ शहरात लपून बसल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अंबरनाथमधून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, दोघांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या कार्यलयात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता, दोघांनी हत्या केल्याची कुबली पोलिसांना दिली. त्यानंतर दोघांना मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. आज (21 फेब्रुवारी) दोन्ही आरोपीना न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना 24 फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सध्या मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT