Tauktae Cyclone: चक्रीवादळाची महाराष्ट्रात एंट्री, मालवण किनारपट्टीवर वाऱ्याचा तुफान वेग
मुंबई: तौकताई चक्रीवादळ (Tauktae Cyclone) हे आता हळूहळू महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिशेने येऊ लागलं आहे. ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील किनारपट्टी भागासह सर्वदूर जाणवू लागला आहे. या वादळामुळे सध्या कोकण किनारपट्टीसह (Konkan coast) पश्चिम महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी काल (15 मे) रात्रीपासूनच पावसाच्या (Rain) सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या हे वादळ सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यात […]
ADVERTISEMENT
मुंबई: तौकताई चक्रीवादळ (Tauktae Cyclone) हे आता हळूहळू महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिशेने येऊ लागलं आहे. ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील किनारपट्टी भागासह सर्वदूर जाणवू लागला आहे. या वादळामुळे सध्या कोकण किनारपट्टीसह (Konkan coast) पश्चिम महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी काल (15 मे) रात्रीपासूनच पावसाच्या (Rain) सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या हे वादळ सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यात घोंघावत असून मालवण (Malvan) किनारपट्टीजवळ वेगाने वारे वाहत आहेत.
ADVERTISEMENT
तौकताई वादळ सध्या आहे तरी कुठे?
तौकताई वादळ हे आता पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पोहचलं आहे. काल रात्रभर हे वादळ गोव्यात घोंघावत होतं. आता या वादळाने महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरु केला असून सध्या हे वादळ मालवण, देवगड या किनारपट्टीच्या भागात पोहचलं आहे. त्यामुळे या भागात जोरदार वारे वाहत असून मुसळधार पाऊस देखील बरसत असल्याचं समजतं आहे.
हे वाचलं का?
आता हळहळू हे वाद सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दिशेने पुढे सरकत असून ते थोड्याच ते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी ही व्यापून टाकणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वादळाचा सर्वाधिक फटका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच बसण्याची शक्यता अधिक आहे. कारण या भागातील किनारपट्टीच्या अगदी जवळून हे वादळ पुढे सरकरणार आहे. त्यामुळे इथे ताशी 100 ते 120 वेगाने वारे वाहणार आहे.
दरम्यान, ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
Tauktae Cyclone: पाहा महाराष्ट्रात कोणत्या वेळी कुठे असणार चक्रीवादळ?
ADVERTISEMENT
मुंबईत कधीपर्यंत पोहचणार तौकताई चक्रीवादळ?
तौकताई वादळ हे 17 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईच्या (Mumbai) आसपास पोहचणार आहे. त्यामुळे मुंबई आणि इतरच्या परिसरात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, या वादळाचा मुंबई आणि जवळच्या परिसराला फारसा फटका बसत नसल्याचं सध्या तरी दिसतं आहे. मुंबईची रचना ही खोबणीत आहे. त्यामुळे सहसा वादळ हे मुंबईवर धडकत नसल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मात्र असं असलं तरीही प्रशासन या वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान तौकताई हे वादळ मुंबईहून पुढे सरकणार आहे.
17 मे (सोमवार) संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास हे वादळ पालघर जिल्ह्यात पोहचणार आहे. त्यामुळे डहाणू (Dahanu), पालघर (Palghar) येथील किनारपट्टी भागातील गावांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आाला आहे. येथे समुद्र खवळण्याची शक्यताही अधिक आहे.
Tauktae Cyclone : महाराष्ट्रातील या दोन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसणार
मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसण्यास सुरुवात
काल रात्री मुंबई आणि नजीकच्या परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. तसंच अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी देखील बरसला. आज सकाळपासून देखील मुंबईत ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसत आहेत.hg
Tauktae Cyclone: चक्रीवादळाने दिशा बदलली, पाकिस्तानवर धडकणारं वादळ आता महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने!
पुण्यात वादळी वाऱ्यामुळे तब्बल 11 ठिकाणी झाडांची पडझड
दुसरीकडे पुण्यात (Pune) काल जोरदार सुटलेल्या वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडं पडल्याचं समोर आलं आहे. काल रात्री 9 ते 11.30 वाजेच्या दरम्यान तब्बल 11 ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाकडे नोंदविण्यात आल्या. साधारण दोन तास पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत असल्याने ही पडझड झाल्याचं समजतं आहे.
येरवडा, कोंढवा, कोथरुड, हडपसर, मुकुंदनगर, कल्याणीनगर, धनकवडी, कात्रज, कसबा पेठ याठिकाणी वादळी वाऱ्यामुळे बरीच झाडं उन्मळून पडली आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या प्रमुखांकडून सर्व अधिकारी आणि जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT