चालकाला मारहाण करत अज्ञात दरोडेखोरांनी सिगरेट घेऊन जाणारा टेम्पो लुटला
चार मिनार सिगरेट कंपनीचे बॉक्स घेऊन जाणारा टेम्पो अज्ञात दरोडेखोरांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी टेम्पोच्या चालकाला मारहाण करत सिगरेटचे २५० कार्टन्स पळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मालाची सध्या बाजारभावाप्रमाणे किंमत ९९ लाख ३७ हजार १७५ रुपये एवढी आहे. सोलापूर – पुणे महामार्गावर टेंभूर्णी शहराच्या अंदाजे दोन-तीन किलोमीटर अंतरावर सोमवारी संध्याकाळी पावणे आठ […]
ADVERTISEMENT
चार मिनार सिगरेट कंपनीचे बॉक्स घेऊन जाणारा टेम्पो अज्ञात दरोडेखोरांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी टेम्पोच्या चालकाला मारहाण करत सिगरेटचे २५० कार्टन्स पळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मालाची सध्या बाजारभावाप्रमाणे किंमत ९९ लाख ३७ हजार १७५ रुपये एवढी आहे.
ADVERTISEMENT
सोलापूर – पुणे महामार्गावर टेंभूर्णी शहराच्या अंदाजे दोन-तीन किलोमीटर अंतरावर सोमवारी संध्याकाळी पावणे आठ वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी टेंभूर्णी पोलीसांमध्ये मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचा चालक मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज (वय 38, रा. बंजाराहिल्स गुरूब्रम्हानगर, हैद्राबाद) हैद्राबाद येथील चार मिनार सिगारेट कंपनीतून टेम्पो (एपी 22/टीए 2972) मध्ये 250 बॉक्स सिगारेट घेऊन भिवंडी येथे पोहचण्यासाठी सोमवारी सकाळी निघाला होता. त्याच्या सोबत मोहम्मद इस्माईल हुसेन (रा. हाफीस पेठ, हैद्राबाद) हा सहकारी वाशी येथील टेम्पो आणण्यासाठी आला होता.
हे वाचलं का?
सायंकाळी साडेसात ते पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान टेंभुर्णी येथील नगरकडे जाणारा पुल ओलांडून टेम्पो दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गेला असता दोन कार सोबत जात होत्या. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने टेम्पोला दुभाजकाकडे दाबले. त्यामुळे चालकाने टेम्पो थांबविला. त्यावेळी मागून आलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी टेम्पोजवळ येऊन चालक व सोबत असलेल्या व्यक्तीला मारहाण व शिवीगाळ करून दोघांच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर हातपाय बांधून त्यांच्याच टेम्पोत बसवून टेम्पो पुढे घेऊन गेले.
चार ते पाच किलोमीटर अंतरावर गेल्यावर दरोडेखोर त्या दोघांना टेम्पोतून खाली घेऊन रस्त्याने चालत अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. दोन ते अडीच तासानंतर चालकाला अज्ञात ठिकाणी सोडून दरोडेखोर निघून गेले. काही वेळाने टेम्पो चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने हातपाय व डोळ्यावर बांधलेली पट्टी सोडली. आपल्या टेम्पोचा शोध घेतला असता त्यांना इंदापूरच्या पुढे महामार्गावर टेम्पो सोडून चार मिनार सिगारेटचे 250 कार्टन्स घेऊन दरोडेखोर पसार झाले होते. यावेळी टेम्पो चालक चालत चालत भीमा नदीजवळच्या सरदारजी ढाब्यावर आला. त्यावेळी टेंभुर्णी पोलीस तेथे आले होते. त्यांना टेम्पो चालकांनी घडलेली घटना सांगितली. या प्रकरणी टेम्पो चालक मोहम्मद इम्तियाज मोहम्मद मुमताज याने फिर्याद दिली आहे असून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT