“राज ठाकरेंनी ‘फक्त भाषा’ हा मुद्दा सोडलाय” ; मनसेसोबत जायला फडणवीसांचा ग्रीन सिग्नल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता केवळ मराठी भाषेचा मुद्दा सोडून व्यापक हिंदुत्व स्वीकारलं आहे, असं निरीक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदविलं. त्यामुळे भाजपला मनसेसोबत जाण्यासाठी आता फडणवीसांचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

शनिवारी रात्री इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले, राज ठाकरे आमचे जुने मित्र आहेत. एकवेळ होता जेव्हा राज ठाकरे यांचे राजकारण खूपच संकुचित होते. ते केवळ ‘मराठी’ याच मुद्द्यावर भाष्य करायचे. महाराष्ट्रात मराठीबद्दल बोलल पाहिजेच. यात वादच नाही. पण मराठीसोबतच इतर भाषिकांचाही सन्मान व्हायला हवा. देशात भाषेच्या आधारावर कुठेही भेदभाव व्हायला नको, हे आमचं मत होतं.

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी केवळ मराठी भाषेचा मुद्दा सोडून त्यांनी व्यापक हिंदुत्व स्वीकारलं आहे. हिंदुत्वाबद्दल आता ते बोलतात. त्यामुळे हिंदुत्व हा दुवा आहेच. पण मी यापूर्वी देखील स्पष्ट केलं आहे की, आमची युतीबाबत बोलणी झालेली आहे किंवा बोलणी सुरु आहे. हा पण सध्या आमचे हिंदुत्वाचे विचार जुळतात आणि या विचारांची देवाण-घेवाण सुरु आहेत. आता महायुतीमध्ये राज ठाकरे येणार की नाही हे याबद्दल आताच भाष्य करणं योग्य होणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

हे वाचलं का?

राज्यसभेला ४० आमदारांची मदत झाली नाही… :

बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेली अधिकची मत शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांपैकी एकाही आमदाराची नव्हती, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीत कोणाची मदत घेतली याबद्दलचं सिक्रेट फोडलं.

फडणवीस म्हणाले,  राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली अधिकची मतं फुटलेल्या ४० आमदारांपैकी कुणाचीच नव्हती. त्यावर मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी तुम्हाला राष्ट्रवादीची मत मिळाली का? असा सवाल केला. त्यावर फडणवीस म्हणाले, मी म्हणतं नाही आम्हाला राष्ट्रवादीची मत मिळाली. काँग्रेसही असू शकत, किंवा इतर दुसरं कोणीही असू शकत. अपक्ष असू शकतात. पण मी एक खूपच स्पष्टपणे सांगू इच्छितो की यातील शिवसेनेचे एकही मतं मिळालं नव्हतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT