उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर दीपाली सय्यद यांनी संजय राऊतांना दिला हा सल्ला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. त्याचा पहिला भाग मंगळवारी तर दुसरा भाग बुधवारी प्रसिद्ध झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना बंड केलेले आमदार, भाजप आणिएकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. तेव्हांपासून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर शिंदे गट, भाजप आणि मनसेचे नेतेदेखील तोंडसुख घेताना पाहायला मिळत आहेत. आता […]
ADVERTISEMENT
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. त्याचा पहिला भाग मंगळवारी तर दुसरा भाग बुधवारी प्रसिद्ध झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना बंड केलेले आमदार, भाजप आणिएकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. तेव्हांपासून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर शिंदे गट, भाजप आणि मनसेचे नेतेदेखील तोंडसुख घेताना पाहायला मिळत आहेत. आता याच मुलाखतीच्या अनुषंगाने शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनीसंजय राऊत यांना एक सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांची देखील संजय राऊत यांनीमुलाखत घ्यावी, असं दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT
शिवसेना फुटल्यापासून दोन्ही गटांच्या संपर्कात राहून ते कसे एकत्र येतील यासाठी दीपाली सय्यद या प्रयत्न करत आहेत. याचबाबतीत त्या दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या. प्रत्येकाला एकत्र येऊ वाटतंय पण कोणी आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवत नाही. आज मुलाखतीच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनातील सर्वकाही बाहेर आले आहे. अशीच मुलाखत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंची घेतली तरी कुठेतरी समेट घडून येईल, असा आशावाद दीपालीसय्यद यांनी व्यक्त केला आहे.
दीपाली सय्यद सुरवातीपासून या दोन गटांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेत आहेत पण अजूनतरी कोणत्याही प्रकारचेयश त्यांना आलेले नाही. एकीकडे जसे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे मुलाखतीद्वारे समोर आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना काय वाटतं हे देखील समोर येणे गरजेचे आहे, असं दीपाली सय्यद म्हणाल्या. एवढे फाटले असतानाही ते शिवण करुन वापरता येईल याकरिता ती गोष्ट मनात असणेही तेवढेच महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. दोन्हीकडचे फाटलेले व्यवस्थित व्हावे यासाठी त्या सध्या दिल्लीत आहेत.
हे वाचलं का?
गरज पडल्यास अमित शहा यांना देखील भेटणार असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या. यापूर्वी शिवसेना आणि भाजपमध्येअमित शहा यांनीच समेट घडून आणली होती. शिवसेना-भाजप युती तुटली होती, त्यांना जोडण्याचं काम अमित शहा यांनी केलं होतं. म्हणून अमित शहा यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे या दोन गटाला एकत्रआणण्यासाठी आपण अमित शहा यांची देखील भेट घेण्यासाठी प्रयत्न करेन , असं सय्यद म्हणाल्या. सध्या दीपालीसय्यद या दिल्लीमध्ये असून त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनाभेटणार असल्याचे त्यांनीच सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT