कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर, ‘या’ सरकारने मागितली आता थेट लष्कराची मदत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) दिवसेंदिवस कोरोनाची (Corona) परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशावेळी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने आता थेट भारतीय लष्कराची (Indian Army) मदत मागितली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) यांना याबाबत पत्र लिहलं आहे.

ADVERTISEMENT

मनिष सिसोदिया यांनी राजनाथ सिंह यांना आवाहन केलं आहे की, दिल्लीत अधिकाधिक ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करुन दिले जावेत. तसंच डीआरडीओने जसे रुग्णालय तयार केले आहेत तसेच दिल्लीत देखील रुग्णालय तयार केले जावे.

याबाबत मनिष सिसोदिया यांनी माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली आहे की, ‘आम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी दळणवळण साधनांची फार आवश्यकता आहे. यासाठी लष्कर, केंद्र सरकार आणि त्यांच्या विविध शाखा तसेच प्रायव्हेट सेक्टरकडे देखील मदत मागितली आहे.’

हे वाचलं का?

Oxygen concentrator: ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर नेमकं आहे तरी काय… त्याची एवढी मागणी का?

दरम्यान, केंद्र सरकारकडे लष्कराच्या मदतीची जी मागणी करण्यात आली आहे त्याबाबत दिल्ली सरकारने हायकोर्टात देखील माहिती दिली आहे. आता दिल्ली हायकोर्टाने याबाबत केंद्र सरकारला उत्तर मागितलं आहे. आज झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारच्या वतीने ASG चेतन शर्मा यांनी सांगितलं की, यावर ते केंद्राकडून सूचना घेतील.

ADVERTISEMENT

कोर्टात सुनावणीदरम्यान केंद्राने सांगितलं की, त्यांचा प्रयत्न आहे की, लोकांना सुरुवातीच्या काळात घरातच उपचार दिले जावेत. जेणेकरुन संसर्ग अधिक वाढणार नाही. याने लोकांना मदत होईल आणि रुग्णालयांवरील भार देखील कमी होईल.

ADVERTISEMENT

दिल्लीत मागील अनेक दिवसांपासून दररोज 20 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. तर मागील दोन दिवसात दिल्लीत 400 हून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. दोन आठवड्यापासून लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊननंतरही दिल्लीत स्थिती नियंत्रणात आलेली नाही.

‘या’ 5 वेबसाइट्स कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन, बेड्स, औषध मिळवून देण्यात करतील मोठी मदत

दिल्लीतील अनेक रुग्णालयात सगळ्यात जास्त चिंता ही बेड्स आणि ऑक्सिजनची आहे. अनेक रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. लोकांना बेड्ससाठी इकडेतिकडे भटकावं लागत आहे. तर ऑक्सिजनचा तुटवडा ही तर चिंतेची बाब ठरत आहे. अनेक रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. तर अनेक ठिकाणी अक्षरश: शेवटच्या क्षणी ऑक्सिजन पोहचवला जात आहे.

दरम्यान, दिल्लीत अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्ध नाही. अशावेळी केंद्र सरकारने सरदार पटेल कोव्हिड सेंटर देखील बनवलं आहे. जिथे ऑक्सिजन बेडची देखील सुविधा आहे. हे संपूर्ण कोविड सेंटर हे आयटीबीपी द्वारे संचालित केलं जात आहे. दुसरीकडे दिल्ली सरकार देखील आपल्या परिने बेड्स वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकार आणि केंद्र यांच्यात ऑक्सिजन पुरवठ्यावरुन तूतू-मैमै सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT