जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त झाल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची टाच आली आहे ही बातमी खरी आहे. मुंबईमध्ये सुंदरबाग सोसायटीने 2007 मध्ये हाय कोर्टमध्ये याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टने त्या साखर कारखान्यांना 1 वर्षाची मुदत द्यायला सांगितली होती. त्यानंतर ते कारखाने विक्रीस काढण्यास सांगितले होते. त्यात जरंडेश्वर कारखाना देखील होता. तो कारखाना घेण्यासाठी 12 ते 15 कंपन्यानी टेंडर दाखल केल होतं. गुरू कमोडिटी कंपनीने तो कारखाना खरेदी केला.

ADVERTISEMENT

जो कारखाना गुरू कमोडिटीने घेतला होता तो कारखाना बी व्ही जी ने तो कारखाना चालवण्यासाठी मागितला होता. त्यांना पाहिलय वर्षात तोटा झाला. ते बॅकफूटवर गेल्यावर माझे नातेवाईक त्यांनी तो चालवायला घेतला. त्यांनाही तोटा झाला. त्यांनी रीतसर परवानगी घेऊन कारखान्याची कपॅसिटी वाढवली त्यासाठी कर्ज घेतलं त्यात पुणे जिल्हा सहकारी बँक आणि इतर बँक आहेत. त्याचं रिपेमेंट व्यवस्थित चालू आहे. तो गुरू कमोडिटी च्या नावाने असल्याने ईडी ने त्यावर टाच आणली. ईडी ला चौकशीचा अधिकारी आहे. मागे इतर अनेक संस्थानीं चौकश्या केल्या त्यातून काही निष्पन्न झाल नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाईल. अनेक शेतकरी आणि आणि कामगारांचं काम त्या कारखान्यावर अवलंबून आहे.

शालिनीताई पाटील यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही हा कारखाना बळकावाला. याबद्दल काय सांगाल असं विचारलं असता अजित पवार म्हणाले की हा आरोप त्यांनी माझ्यावर पहिल्यांदा केला आहे का? ज्यावेळेस झालं आहे तेव्हापासून त्या तसाच आरोप करत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने कारखाना विक्रीला काढला तो कारखाना कुणी बळकावू शकतं का? कारखाना संचालक बोर्डाने विकलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्याप्रमाणेच तो विक्रीला काढण्यात आला होता. हे सगळं रेकॉर्ड ईडीच्या लोकांना दाखवलं आहे. अलिकडे देशात काय परिस्थिती आहे काय राजकारण सुरू आहे आपण सगळेजण बघत आहात. त्यामागचं कारण कळत नाही. पण न्याय मिळतो, न्यायावर माझा विश्वास आहे. माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त किंमतीला जरंडेश्वर सहकारी कारखाना विकला गेला आहे. अनेक कारखाने हे 30 कोटी ते 40 कोटींना विकले गेले. मी एक उदाहरण सांगतो, जरंडेश्वरएवढीच क्षमता असलेला एक काऱखाना चार कोटीला विकला गेला आहे. मात्र तिकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. मराठवाड्यात काही कारखाने चार कोटीला विकले गेले. 12 कोटी, 15 कोटीला विकले गेले. कारखाने सगळ्यांनीच घेतले. काही भाजपचे लोक आहेत, काही काँग्रेसचे लोक आहेत. सगळ्यांनी कारखाने घेतले असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT