मैं रुकेगा नहीं…! अजित पवारांचे पुण्यात आज तब्बल ३१ कार्यक्रम

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पुणे महापालिकेची मुदत सोमवारी संपत असून, राजकीय ओबीसी आरक्षणामुळे यंदाची महापालिका निवडणूक काही महिने लांबणीवर पडणार आहे. हे लक्षात घेऊन महापालिकेची मुदत संपुष्टात येण्यास काही तास बाकी असताना पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांनी अनेक कामांची उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. त्यामुळे अजित पवार आज तब्बल ३१ कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे १० कार्यक्रम होणार आहेत.

ADVERTISEMENT

अजित पवाराच्या पुण्यातील कार्यक्रम सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झाले आहेत, तर चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमांना ११ वाजता सुरुवात होणार आहे. या दोन्ही ‘दादां’ची तोफ पुणे शहरात धडाडणार आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक होण्याचीच शक्यता आहे.

अजित पवार यांचे दिवसभरातील कार्यक्रम…

सकाळी ७ वाजता सुस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामांची पाहणी

हे वाचलं का?

सकाळी ७.३० वाजता वारजे माळवाडी येथे क्रीडा संकुल व क्लब हाऊस-भूमिपूजन समारंभ

सकाळी ८ वाजता वारजे येथे कै. सुभदा प्रभाकर बराटे मल्टिस्पेशालिटी व मॅटर्निटी रूग्णालयास सदिच्छा भेट

ADVERTISEMENT

सकाळी ८.३० वाजता शिवणे येथे शिवणे-नांदेड पूलाचा उद्घाटन समारंभ व विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन

ADVERTISEMENT

सकाळी ९ वाजता कात्रज डेअरी सरहद शाळा चौक येथे कात्रज डेअरीमधून जाणारा २४ मीटर सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ रस्ता लोकार्पण सोहळा

सकाळी ९.४५ वाजता राजीव गांधी नगर बालाजी नगर, पुणे येथे स्व.माणिकचंद नारायणदास दुगड रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा

सकाळी १०.२५ वाजता सुखसागर नगर येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

१) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम क्रीडा संकुल

२) पोलीस चौकी

३)महिला बचत गट कार्यालय

४) कै. किसनराव माऊली कदम उद्यान प्रयाण

सकाळी ११ वाजता मिठानगर, काँढवा खुर्द, येथे

१) माँ खदीजा (र.अ.) प्रसुतिगृहाचा लोकार्पण सोहळा

२) हजरत अब्दुल रहेमान (रहे) ओटा मार्केटचा लोकार्पण सोहळा

सकाळी ११.४५ वाजता कौसर बाग येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम

१) डॉ. सय्यदना मोहम्मद बुराउद्दीन उद्यान

२) ‘बाग जन्नत’ कब्रस्तान ३)मुख्य भैरोबानाला ते एन.आय.बी.एम परिसर मलवाहिनी

दुपारी १२.३० वाजता वानवडी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन / लोकार्पण सोहळा

१) ४५ फूट उंच राष्ट्रध्वज भूमिपूजन

२) १०० बेडचे रूग्णालय व ३) बॅडमिंटन हॉल लोकार्पण

दुपारी १.१५ वाजता ११० रामटेकडी, प्रभाग क्र. २४ येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा –

१) पंचशील बुद्ध विहार

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन

दुपारी ३ वाजता कृषिभवन, शिवाजीनगर येथे जिल्हास्तरीय धान्य महोत्सव कार्यक्रमास भेट

दुपारी ४.१० वाजता पंचशील चौक, ताडीवाला रोड, पुणे येथे आगमन नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण

दुपारी ४.३० वाजता प्रभाग क्र. फुलेनगर-नागपूर चाळ, आळंदी रोड येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन

सायंकाळी ५.१५ वाजता धानोरी जकात नाका, धानोरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

१) राजयोग मेडिटेशन सेंटर

२) अग्निशामक केंद्र

३) माजी सैनिक सांस्कृतिक भवन

४) भव्य उद्यान

सायंकाळी ६ वाजता वडगांव शिंदे रोड, लोहगाव, येथे’ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूल’ भूमिपूजन सोहळा

सायंकाळी ६.५० वाजता प्रभाग क्रं. ०३, खराडी, येथेऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन आणि सभा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT