समीर वानखेडेंवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नवाब मलिक यांना फडणवीसांनी दिला सल्ला, म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचं काम नवाब मलिक यांनी करू नये अशी प्रतिक्रिया आता देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समीर वानखेडे यांची चौकशी करायची असेल तर ती एनसीबीने जरूर करावी. त्या चौकशीत दूध का दूध आणि पानी का पानी होईल. मात्र समीर वानखेडेंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशा पद्धतीने बदनाम करण्याचं काम जे नवाब मलिक करत आहेत ते योग्य नाही. नवाब मलिक यांच्याकडे जर काही ठोस पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं असाही सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना दिला आहे.

ADVERTISEMENT

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. त्याची केस न्यायालयात सुरू आहे. अशावेळी तपास अधिकाऱ्याबद्दल अशी वक्तव्यं करणं हे संविधानिक पद भुषवणाऱ्या मंत्र्याला शोभत नाही. नवाब मलिक हे मंत्री आहेत त्यांनी अशा प्रकारे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करायला नको असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Drugs Case : नवाब मलिक यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांची भेट, म्हणाले…

हे वाचलं का?

नवाब मलिक यांचे आरोप

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तीगत आरोप केले आहेत. त्यांचा निकाहनामा समोर आणला. तसंच त्यांच्या वडिलांचं नाव कसं दाऊद आहे ते समोर आणलं. सोमवारी तर त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातला फोटोच पोस्ट केला आणि पहचान कौन असं कॅप्शन दिलं. नवाब मलिक यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जात प्रमाणपत्राचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसंच इतरही अनेक व्यक्तीगत आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

ड्रग्ज प्रकरणाबाबत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (NCB) निशाणा साधला होता. मलिक यांनी एनसीबीचे साक्षीदार फिक्सर असल्याचा आरोप केला होता. NCB केवळ ठराविक साक्षीदारांद्वारे बनावट छापे मारते. असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर एनसीबीचे अधिकारी अस्वस्थ झाले. पण तरीही त्यांनी यावर फार काही भाष्य केलं नव्हतं. यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण जस्मिन वानखेडे आणि फ्लेचर पटेल नावाच्या व्यक्तीचे फोटो शेअर करुन काही सवाल उपस्थित केले होते.

ADVERTISEMENT

फ्लेचर पटेल हा जास्मिन वानखेडेंचा भाऊ असल्याचं म्हटलं जात आहे. पण हाच व्यक्ती एनसीबीच्या अनेक प्रकरणांमध्ये पंच किंवा साक्षीदार कसा काय असतो? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.ज्यानंतर फ्लेचर पटेल याने स्वत: माध्यमांना अशी माहिती दिली होती की, मला साक्षीदार बनविण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. मी ड्रग्सविरोधात एनसीबीलामदतच करत असतो. असंही नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT