अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडवली; देवेंद्र फडणवीस संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयात जाऊन फाईल्स पाहतानाचा एक फोटो व्हायरल झाला असून, याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाकडून सोमय्यांना नोटीस देण्यात आल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. ‘मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

ADVERTISEMENT

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. व्हायरल झालेल्या फोटोबाबत खुलासा करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सोमय्यांना देण्यात आलेली नोटीस ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

हे वाचलं का?

‘मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले, तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा’, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

‘मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना सुद्धा नोटीसा! हाच का तुमचा पारदर्शी कारभार?’, असा सवाल फडणवीसांनी केला आहे.

ADVERTISEMENT

‘शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता?’, अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते. याठिकाणी ते अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल्स बघतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचंही दिसत आहे. याच फोटोवरून सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

‘गोपनीयतेचा भंग केलेला नाही’

या प्रकरणावर किरीट सोमय्या यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही. मी केवळ घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली. कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलं नाही. मी कुणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती काँग्रेसला का वाटत आहे?’, असं सोमय्या यांनी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT