अपरिपक्वता की श्रेयवाद?, लॉकडाऊनच्या गोंधळावरुन देवेंद्र फडणवीसांची सरकारवर बोचरी टीका
मुंबई: राज्यात उद्यापासून 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) हटविण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज (3 जून) मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन केली. अचानक घेण्यात आलेल्या एवढ्या मोठ्या निर्णयाबाबत संपूर्ण राज्यातील जनतेला आश्चर्य वाटलं. पण काही वेळातच महाराष्ट्र सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून (MAHARASHTRA DGIPR) स्पष्ट करण्यात आलं की, राज्यातील निर्बंध […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्यात उद्यापासून 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) हटविण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज (3 जून) मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन केली. अचानक घेण्यात आलेल्या एवढ्या मोठ्या निर्णयाबाबत संपूर्ण राज्यातील जनतेला आश्चर्य वाटलं. पण काही वेळातच महाराष्ट्र सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून (MAHARASHTRA DGIPR) स्पष्ट करण्यात आलं की, राज्यातील निर्बंध हे हटविण्यात आलेले नाहीत. यावरुनच सरकारमध्ये लॉकडाऊनबाबत बराच गोंधळ असल्याचं समोर आलं. हा संपूर्ण गोंधळ समोर आल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तात्काळ सरकारवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
खरं तर आतापर्यंत लॉकडाऊन किंवा अनलॉक याबाबतचे सगळे निर्णय हे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सीएमओ कार्यालयाकडून जाहीर केले जात होते. मात्र आज अचानक दुपारच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात अनलॉकसाठी पाच लेव्हल करण्यात आल्या असून पहिल्या लेव्हलमधील 18 जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात येईल अशी घोषणा केली होती.
हे वाचलं का?
Confusion over Lockdown: लॉकडाऊन हटवण्याबाबत प्रचंड मोठा गोंधळ, सरकार म्हणतं अजून लॉकडाऊन हटवलेला नाही!
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ही घोषणेची बातमी संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. पण अवघ्या काही तासात महाराष्ट्र सरकारच्या जनसंपर्क विभागाने थेट आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन स्पष्ट केलं की, राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे.
ADVERTISEMENT
यामुळे विजय वडेट्टीवार यांची घोषणा म्हणजे श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न होता का? अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका
या संपूर्ण प्रकरानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून बरीच टीका केली आहे.
काय सुरू, काय बंद?
कुठे आणि केव्हापर्यंत?
लॉक की अनलॉक?
पत्रपरिषद की प्रेसरिलीज?
अपरिपक्वता की श्रेयवाद?
असे सवाल उपस्थित करुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर बरीच टीका केली आहे. आता त्यांच्या या टीकेला महाविकास आघाडी नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय सुरू, काय बंद ❓
कुठे आणि केव्हापर्यंत❓
लॉक की अनलॉक❓
पत्रपरिषद की प्रेसरिलीज❓
अपरिपक्वता की श्रेयवाद❓#Lock #Unlock pic.twitter.com/bZF1AEx9yY— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 3, 2021
Maharashtra Unlock: उद्यापासून 18 जिल्ह्यात लॉकडाऊन नाही: विजय वडेट्टीवार
पाहा लॉकडाऊनच्या त्या’ घोषणेबाबत सरकारने नेमकं काय दिलं स्पष्टीकरण?
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दी चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत.
राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल.
स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT