MPSC ला स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नाही, स्वप्नील लोणकरची आत्महत्या दुर्दैवी-फडणवीस
MPSC ला स्वायतत्ता दिली म्हणजे स्वैराचार नाही. परीक्षा उतीर्ण होऊन नोकरी न मिळाल्याने पुण्यात स्वप्नील लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करून द्यायाला हवं, मात्र परीक्षा झाल्यानंतर दोन-दोन वर्षे मुलाखती होत […]
ADVERTISEMENT
MPSC ला स्वायतत्ता दिली म्हणजे स्वैराचार नाही. परीक्षा उतीर्ण होऊन नोकरी न मिळाल्याने पुण्यात स्वप्नील लोणकर या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करून द्यायाला हवं, मात्र परीक्षा झाल्यानंतर दोन-दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून आता तरूणाने आत्महत्या केली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं.
ADVERTISEMENT
पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, एकूणच MPSC च्या कार्यपद्धतीचं नव्याने अवलोकन करणं आवश्यक आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरूण यामुळे भरडले. MPSC ला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. स्वप्नील लोणकर या तरूणाने आत्महत्या केली आहे. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससीची परीक्षा उतीर्ण झाला. उतीर्ण झाल्यानंतर दीड वर्ष होऊन त्याला नियुक्ती मिळाली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. ज्या घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त होते आहे.
दोन-दोन वर्षे उमेदवारांचा इंटरव्ह्यू होत नाही. हे नक्की कसं धोरण आहे? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी त्यांची भूमिका मांडली. ‘मला वाटतं सरकार पोलिसांच्या भरवशावर कदाचित मोर्चेकऱ्यांना थांबवू शकेल. पण त्यांच्या मनातल्या भावना कशा थांबवणार? कुणालाही कोरोना काळात मोर्चे काढण्याची इच्छा नाही. मात्र ती वेळ आता मराठा समाजावर आली आहे. सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जाते आहे. केंद्राकडे बोट दाखवलं जातं आहे. राज्य मागासवर्गाने मराठा समाज कसा मागास आहे हे पटवून द्यावं लागेल. सरकारने हे अद्याप केलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मराठा आरक्षण उद्या मिळेल असं नाही. मात्र सरकारचं धोरण असं आहे की भविष्यातही ते मिळू नये. त्यामुळेच मराठा समाजाच्या मनात उदेक आहे ‘ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT