चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीयही मुंबईकरच -देवेंद्र फडणवीस
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. मागच्या तीन ते चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय मुंबईकरच आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत. उत्तर भारतीय संघाने कर्करोगग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच यात्रेकरूंसाठी उभारलेल्या विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीसांनी हे विधान केलं आहे. वांद्रे पूर्व येथे हे नव्याने बांधण्यात […]
ADVERTISEMENT
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. मागच्या तीन ते चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय मुंबईकरच आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
उत्तर भारतीय संघाने कर्करोगग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच यात्रेकरूंसाठी उभारलेल्या विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीसांनी हे विधान केलं आहे. वांद्रे पूर्व येथे हे नव्याने बांधण्यात आलेल्या बाबू आर एन सिंह गेस्ट हाऊसचे उद्घाटन त्यांनी केले.
‘ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत, ते सगळेच मुंबईकर आहे. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
एके काळी देशातले बडे नेते मंदिरात लपूनछपून जात असत, फडणवीसांचा पवारांना टोला?
हे वाचलं का?
‘मुंबईत टाटा कॅन्सर रूग्णालय येथे उपचारासाठी देशभरातून येणाऱ्या कर्करोग रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांसाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारामुळे अनेकांना याचा फायदा होईल तसेच दिलासाही मिळेल.’
यावेळी फडणवीसांनी वडिलांना कर्करोगाच्या उपचारासाठी नेतानाचाही अनुभव सांगितला. ‘मी अनेक रूग्णांच्या नातेवाईकांना तसेच रूग्णांनाही रस्त्यावर राहताना पाहिलं आहे. रूग्णांच्या नातेवाईकांची गरज आणि मागणी लक्षात घेता या बाबु आरएन सिंह गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची तसेच अन्नाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यल्प दरात अशी ही व्यवस्था गेस्ट हाऊसच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. रूग्णसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे,’ असेही फडणवीस याप्रसंगी म्हणाले.
ADVERTISEMENT
‘जातीयवाद ते खोटारडेपणा’ शरद पवारांविरोधात फडणवीसांचे १३ ट्विट
ADVERTISEMENT
उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर.एन. सिंह म्हणाले, ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’ ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातून विशेष म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कर्करोगग्रस्त रुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात येतात.’
उत्तर भारतीय संघ की ओर से श्री. आर. एन. सिंह अतिथि गृह का आज मुंबई में लोकार्पण किया।
मंगलप्रभात लोढा जी, संतोष आर.एन. सिंह, कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह आदी उपस्थित थे।
कैंसर पीडितों के सेवा के लिए यह अतिथि गृह स्व. आर. एन. सिंह जी का सपना था.
आज उनका वह सपना साकार हुआ। pic.twitter.com/IK6lj9ZAgL— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 15, 2022
‘रुग्णांच्या कुटुंबियांनाही रुग्णालयाबाहेर रस्त्यावर राहावं लागत आहे. अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय अल्प दरात बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय देवदर्शनाला येणाऱ्या नागरिकांना सुद्धा अतिथीगृह उपलब्ध करून देण्यात येईल. या अतिथीगृहात परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे जेवणही मिळेल,’ असं सिंह यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT