शेवटच्या काही वर्षांत लतादीदींच्या मनात काय चाललं होतं? धर्मेंद्र यांनी सांगितली आठवण
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन मागच्या रविवारी म्हणजेच 6 फेब्रुवारीला झालं. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येण्यासाऱखी आहे. लता मंगेशकर यांना शेवटच्या काही वर्षांमध्ये नेमकं काय वाटतं होतं? हे आता ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलं आहे. आजतकने लता दीदींना आदरांजली देणारा ‘श्रद्धांजली तुम मुझे भुला न पाओगे’ कार्यक्रम आयोजित केला. त्यात धर्मेंद्र […]
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन मागच्या रविवारी म्हणजेच 6 फेब्रुवारीला झालं. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येण्यासाऱखी आहे. लता मंगेशकर यांना शेवटच्या काही वर्षांमध्ये नेमकं काय वाटतं होतं? हे आता ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलं आहे. आजतकने लता दीदींना आदरांजली देणारा ‘श्रद्धांजली तुम मुझे भुला न पाओगे’ कार्यक्रम आयोजित केला. त्यात धर्मेंद्र यांनी लतादीदींची आठवण सांगितली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत धर्मेंद्र?
धर्मेंद्र यांनी सांगितलं की लता मंगेशकर या शेवटच्या काही वर्षांमध्ये आपल्या एकटेपणाला कंटाळल्या होत्या. लता मंगेशकर यांच्याशी मी गेल्या 3-4 वर्षांपासून संपर्का होतो. त्या त्यांच्या एकटेपणापासून पळू पाहात होत्या. मी एकदा एक ट्विट केलं ते काहीसं सॅड होतं. त्यावेळी लगेच लता मंगेशकरांचा मला फोन आला. त्यांनी मला चिअरअप केलं, निराश होऊ नकोस असं सांगितलं. आम्ही जवळपास अर्धा तास बोलत होतो. माझंही वय झालं आहे. मी समजू शकतो की या वयात काय वाटतं? जेव्हा आपल्या हाती काम राहात नाही तेव्हा ते रिकामेपण सतावू लागतं.
हे वाचलं का?
लता मंगेशकर यांचं वय जास्त होतं. माझंही वय भरपूर झालं आहे. या वयात निराशाजनक विचार येतात. माणूस जुन्या आठवणींमध्ये रमतो. जुन्या आठवणी सतत समोर येत असतात. बऱ्याचदा माणूस बोलून दाखवत नाही पण एकटेपणामुळे माणूस तुटून जातो असंही धर्मेंद्र यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मी जायचं ठरवलं होतं. तीनवेळा मी तयारही झालो होतो. पण मी जाऊ शकलो नाही असं धर्मेंद्र यांनी सांगितलं. लतादीदींवर मी माझ्या सख्ख्या बहिणीपेक्षा अधिक जास्त प्रेम केलं. अशा शब्दांमध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते.
ADVERTISEMENT
व्हेंटिलेटरवर असताना लता मंगेशकर यांनी मागवला होता इयरफोन, जाणून घ्या काय होतं यामागचं कारण..
पुन्हा लता मंगेशकर व्हायला आवडणार नाही असंही म्हणाल्या होत्या लतादीदी
लता मंगेशकर यांनी एका हिंदी चॅनलला मुलाखत दिली होती. त्यात पुन्हा जन्म मिळाला तर लता मंगेशकर म्हणूनच जन्म घ्यायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबाबत लता मंगेशकर यांनी हे उत्तर दिलं होतं की ‘पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म घ्यायला आवडेल का हा प्रश्न मला आधीही विचारण्यात आला होता. त्याावेळी मी जे उत्तर दिलं होतं तेच उत्तर देईन. मला पुन्हा जन्म मिळू नये आणि मिळालाच तर मला लता मंगेशकर व्हायचं नाही.’ मुलाखत घेणाऱ्याने का? असं विचारताच लतादीदी म्हणाल्या की ‘लता मंगेशकर असण्याच्या अडचणी काय आहेत किंवा समस्या काय आहेत त्या फक्त तिलाच माहित आहेत.’ असं म्हणून त्या दिलखुलास हसल्या. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT