औरंगाबाद : घटस्फोटीत पत्नीला भेटण्याचा बहाणा करुन धारदार शस्त्राने केली हत्या, आरोपी पती अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

घटस्फोट दिलेल्या पत्नीला भेटण्याचा बहाणा करुन पतीने तिच्यासोबत वाद घालून धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी येथे गुरुवारी १८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.

ADVERTISEMENT

मुळची नांदेड जिल्ह्यातील शिवकन्या किरण खिल्लारे वय 23 हिचा पती किरण खिल्लारे याच्या सोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादामुळे शिवकन्या ही किरण पासून फारकत घेऊन, आई जनाबाई कैलास सतावे यांच्यासोबत सध्या रांजणगाव शेणपुंजी येथे घरमालक पवार यांच्या रूममध्ये भाड्याने राहत होती.

गुरुवारी 18 नोव्हेंबर रोजी आरोपी पती किरण केशव खिल्लारे हा देहगाव जि. नांदेड येथून पत्नी शिवकन्या हिला भेटण्यासाठी रांजणगाव येथे आला होता.रांजणगावातील घरी आल्यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास सासू जनाबाई ही घराबाहेर होती. यावेळी किरण आणि शिवकन्या यांच्यात वाद झाला. या दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने आरोपी किरण खिलारे याने धारदार शस्त्राने पत्नी शिवकन्या हिच्यावर सपासप वार करत तिला गंभीर जखमी केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडताच आरोपी किरण घरातुन फरार झाला.

हे वाचलं का?

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त वनमाला वनकर, सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ आणि स्थानिक एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन, पाहणी केली.या हल्ल्यात गंभीर जखमी शिवकन्या हिस उपचारार्थ घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळाहून फरार झालेल्या पतीच्या शोधात पथके तयार करून त्यास पकडून जेरबंद केले. या खुनाची नोंद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस तपास करत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT