राज ठाकरे ‘हिंदू हृदयसम्राट’ नाही, ‘मराठी हृदयसम्राट’च -मनसे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिका निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले असून, सगळ्यांच पक्ष तयारीला लागले आहेत. अशाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हिंदू ह्रदयसम्राट अशी उपाधी असलेले बॅनर्स घाटकोपरमध्ये झळकले होते. याची बरीच चर्चा झाली. त्यानंतर मनसे यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करत मनसैनिकांना असा उल्लेख न करण्याचं आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदयसम्राट म्हणून संबोधलं जातं. त्यांच्या व्यतिरिक्त कुणाच्याही नावाआधी अशा स्वरूपाची उपाधी वापरली गेलेली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरला. या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदू हृदयसम्राट असा उल्लेख केला गेला होता.

या बॅनरची सगळीकडे चर्चा झाली. याचसंदर्भात मनसेकडून आवाहन करण्यात आलं आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांसाठी…

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या हृदयात सर्वोच्च स्थान असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या उपाधी व्यतिरिक्त (म्हणजे ‘मराठी हृदयसम्राट’ व्यतिरिक्त) इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. कृपया या सूचनेचं तंतोतंत पालन व्हावं, ही नम्र विनंती”, असं आवाहन महाराष्ट्र निर्माण सेनेनं पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

‘हिंदुहृदयसम्राट राज ठाकरे’ मुंबईत झळकला बॅनर, निवडणुकांपूर्वी मनसेचं हिंदुत्व कार्ड

ADVERTISEMENT

यापूर्वी राज ठाकरेंनीही दिल्या होत्या सूचना

ADVERTISEMENT

मला हिंदू ह्रदयसम्राट म्हणून नका असं स्पष्टपणे राज ठाकरे एका बैठकीत पदाधिकाऱ्यांना म्हणाले होते.२०२० मध्ये झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात आजचे हिंदू हृदयसम्राट असा उल्लेख कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. “मला हिंदू हृदयसम्राट म्हणू नका. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदराने हिंदू हृदयसम्राट असं संबोधलं जातं. केवळ शिवसैनिकच नाही, तर सर्वपक्षीयांनी बाळासाहेबांना ही उपाधी बहाल केली आहे”, असं राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT