डोंबिवली : आईला जामिन मिळवून देण्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
ड्रग्ज प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीची आई सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मी तुझ्या आईला जामीन मिळवून देण्यात मदत करतो असं आमिष दाखवून आरोपीने या मुलीवर बलात्कार केल्याचं कळतंय. प्रदीप बेहरा असं या आरोपीचं नाव असून मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी प्रदीप हा […]
ADVERTISEMENT
ड्रग्ज प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीची आई सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मी तुझ्या आईला जामीन मिळवून देण्यात मदत करतो असं आमिष दाखवून आरोपीने या मुलीवर बलात्कार केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
प्रदीप बेहरा असं या आरोपीचं नाव असून मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी प्रदीप हा कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या एका ढाब्याच्या बाजूला असलेल्या इमारतीत राहतो. मानखुर्द भागात राहणारी ही महिला ड्रग्जप्रकरणी न्यायालयीन कोठडीत अर्थात जेलमध्ये होती. ही महिला जेलमधून बाहेर आल्यानंतर तिच्या १४ वर्षीय मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईला सांगितली.
प्रदीपने आईला जामीन देण्याचे या मुलीला आश्वासन दिले. ३० ऑक्टोबरच्या रात्री त्याने त्या मुलीला कल्याण पूर्वे-तील एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केला. आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती सदर महिलेने मानपाडा पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३७६, ३७६ (३) सह बालकांवरील लैंगिक अत्याचारांचे अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी पसार झाला होता. मात्र पोलिसांचे शोध शुरू असतानाच आरोपी प्रदीप पोलिसांच्या तावडीत सापडला. कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता ४ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT