डॉन छोटा राजनला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण २०१३ मधलं हत्येच्या प्रयत्नाचं आहे. २०१३ मध्ये छोटा राजनने बुकी अजय गोसालिया याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. १९५७ मध्ये जन्मलेल्या राजेंद्र निकाळजेचं नाव नंतर छोटा राजन असं पडलं. त्याला २०१३ च्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवत विशेष सीबीआय कोर्टाने १० […]
ADVERTISEMENT
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण २०१३ मधलं हत्येच्या प्रयत्नाचं आहे. २०१३ मध्ये छोटा राजनने बुकी अजय गोसालिया याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. १९५७ मध्ये जन्मलेल्या राजेंद्र निकाळजेचं नाव नंतर छोटा राजन असं पडलं. त्याला २०१३ च्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवत विशेष सीबीआय कोर्टाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच ५ लाख रूपयांचा दंडही ठोठावला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
हे वाचलं का?
2013 मध्ये अजय गोसालिया हा बुकी असणारा व्यक्ती त्यावेळी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करू लागला होता. तो इन्फिनिटी मॉलमधून बाहेर पडत असताना त्याच्यावर तिघांनी गोळ्या चालवल्या. २८ ऑगस्ट २०१३ ला ही घटना घडली होती. हा गोळीबार करण्याचे आदेश छोटा राजनने दिले होते असं सीबीआयने म्हटलं आहे. छोटा राजनने त्याच्या विश्वासातल्या सतीश कलियाला यासंदर्भात सांगितलं होतं. गोसालियावर जो गोळीबार झाला त्यात तो जखमी झाला. पण त्याने तिथून जिवाच्या भीतीने पळून गेला. त्याच्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या मोठ्या पेंडंटला एक गोळी चाटून गेली होती.
ADVERTISEMENT
याप्रकरणी २८ ऑगस्ट २०१३ ला गुन्हा दाखल करण्यात आला. कलम ३०७, 12 B या अंतर्गत आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं. २०१३ मध्ये विशेष सेलने ७ जणांविरोधात चार्जशीट फाईल केलं. या प्रकरणातले ३ आरोपी प्रकाश निकम, सतीश कलिया आणि छोटा राजन हे वाँटेड होते. निकम आणि कलिया या दोघांना जे डे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. छोटा राजनला जेव्हा बालीमधून भारतात आणण्यात आलं तेव्हा गोसालियाचं प्रकरणही सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. आत्ता या प्रकरणात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT