…यामुळे देशाचं नुकसान होईल, माझी हात जोडून विनंती आहे, असे का म्हणाला अक्षय कुमार?
अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट रक्षाबंधनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आणि नेमकं याचवेळी सोशल मीडियावर चित्रपटांच्या बाबतीत ‘बॉयकट’ हॅशटॅगसह ट्रेंड होत आहे. हा ट्रेंड निर्माण करण्याच्या बाबतीत बॉलीवूड संकटातून जात असल्याचं अभिनेता अक्षय कुमार म्हणाला आहे. इंडिया टुडेशी एका खास संभाषणात बोलताना अक्षय कुमारने भूमिका मांडली आहे. आणि त्याने सर्वांना विनंती केली की त्यांनी चित्रपटांवर […]
ADVERTISEMENT
अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट रक्षाबंधनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आणि नेमकं याचवेळी सोशल मीडियावर चित्रपटांच्या बाबतीत ‘बॉयकट’ हॅशटॅगसह ट्रेंड होत आहे. हा ट्रेंड निर्माण करण्याच्या बाबतीत बॉलीवूड संकटातून जात असल्याचं अभिनेता अक्षय कुमार म्हणाला आहे. इंडिया टुडेशी एका खास संभाषणात बोलताना अक्षय कुमारने भूमिका मांडली आहे. आणि त्याने सर्वांना विनंती केली की त्यांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकू नये.
ADVERTISEMENT
अक्षय कुमार बॉयकॉट ट्रेंडवरती काय म्हणाला?
2022 हे वर्ष अक्षय कुमारसाठी त्याच्या करिअरच्या दृष्टीने चांगले राहिलेले नाही. त्याचे शेवटचे दोन रिलीज, बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज, बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ठरले . पुढे, तो 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या रक्षाबंधनामध्ये दिसणार आहे. त्याच्या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी, अक्षयने इंडिया टुडेशी बोलताना बॉयकॉट संस्कृतीबद्दल म्हणंण मांडलं. तो म्हणाला, “आपल्या इथे तर सर्व गोष्टींवर बहिष्कार टाका, कुणाचे तरी चॅनल बॅन करा. कुणाचे हे बॅन करा कुणाचे ते बॅन करा? ही एक फॅशन झाली आहे. मी त्या लोकांना हात जोडून विनंती करतो. मला त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे. चित्रपट बॅन करुन कुणाचे नुकसान होणार आहे? असे केल्याने देशाचे नुकसान होणार आहे.”
अक्षय कुमारने हात जोडून काय केली विनंती?
चित्रपट बॅन करा, चॅनेल बॅन करा, त्यांना वाटले तर ते इंडस्ट्री बॅन करा म्हणतील पण याने आपल्या देशाचे नुकसान होणार आहे. मी म्हणेन की यात काही गैर नाही. मला हात जोडून प्रार्थना करायची आहे. आपल्य देशाची अर्थव्यवस्था थांबवू नका हे चांगले नाही, कृपया ती चालू दिया. हे सर्व पसरवून आपला देश पुढे जाणार नाही. तुम्ही पसरवत आहात ही चुकीची गोष्ट आहे. म्हणून मी फक्त हात जोडून म्हणेन की या सर्व गोष्टी करू नका, हे चांगले लक्षण नाही.
हे वाचलं का?
तुला इंडस्ट्री मधला कोणात एखादा ट्रेंड रद्द करावा वाटेल असा प्रश्न अक्षयला विचारला असता तो म्हणाला, “पहा, प्रत्येकाला जे काही लिहायचे आहे ते लिहिण्याचा अधिकार आहे. त्यांना बोलण्याचे सर्व स्वातंत्र्य आहे, त्यामुळे ते त्यांना हवे ते लिहू शकतात. पण पुन्हा एक विनंती आहे. या सर्व गोष्टी पसरवू नका, ही चांगली गोष्ट नाही.”
लोक चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याबद्दल अक्षयची प्रतिक्रिया
गेल्या काही आठवड्यांपासून लोक या ना त्या कारणाने हिंदी चित्रपटांवर बहिष्कार घालत आहेत. ट्विटरवर ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’, डार्लिंग्स या चित्रपटांवरती ऑनलाइन आक्षेप घेतल्यानंतर, बॉलिवूड नक्कीच चांगल्या स्थितीत नाही. मीडियाशी बोलताना अक्षय कुमारने यावर आपले विचार मांडले . तो म्हणाला, “असे काही लोक आहेत जे या गोष्टी करतात. ते खोडसाळपणा करत आहेत. ते ठीक आहे. हा एक स्वतंत्र देश आहे.
ADVERTISEMENT
प्रत्येकाला हवे ते करण्याची मुभा आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मदत होते. याला काहीच अर्थ नाही जेव्हा लोक अशा गोष्टी करतात. आपण सर्वजण आपला देश सर्वात मोठा आणि महान बनवण्याच्या मार्गावर आहोत. मी सर्वांना विनंती करेन की अशा गोष्टी हायलाइट करू नका. हे आपल्या देशासाठी चांगले आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT