माझ्या भवितव्याची चिंता करु नका, मनात भाजप कायम – उत्पल पर्रिकरांनी इतर पक्षांच्या ऑफर धुडकावल्या
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला पहिल्याच प्रयत्नात मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आलेला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर याने अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. उत्पल पर्रिकरने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली. भाजपने पणजी मतदारसंघातून बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उत्पल पर्रिकरांसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने […]
ADVERTISEMENT
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला पहिल्याच प्रयत्नात मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आलेला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर याने अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. उत्पल पर्रिकरने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली.
ADVERTISEMENT
भाजपने पणजी मतदारसंघातून बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उत्पल पर्रिकरांसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दोन पर्याय दिले होते. परंतू हे पर्याय आपल्याला मान्य नसून, माझ्या वडिलांनी ज्या गोष्टींसाठी गोव्याचं आणि पणजी मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्याचा वारसा पुढे चालवणं कर्तव्य असल्याचं म्हणत उत्पलने आपला अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय जाहीर केला.
मध्यंतरी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी पणजीत उत्पल पर्रिकरांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेतली होती. अनेक नेत्यांनी उत्पल यांना पक्षात येण्याची ऑफरही दिली. परंतू उत्पल यांनी या सर्व ऑफर धुडकावून लावत माझ्या भवितव्याची चिंता करु नका असं सांगितलं आहे.
हे वाचलं का?
इतरांनी माझ्या भवितव्याची चिंता करु नये, माझं भवितव्य पणजीची जनता ठरवेल. माझ्या मनात भाजप कायम आहे. माझ्या पक्षाने मला दिलेला पर्याय मान्य नाहीये तर मी इतर पक्षांचे पर्याय कसा मान्य करेन. मी भाजपमध्ये आहे की नाही हे आता केंद्राने ठरवावं. मी पक्ष सोडणार नाही असंही उत्पल पर्रिकरांनी सांगितलं.
पणजीत आता ज्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं आहे त्याच्याविषयी मी काहीही बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हणत उत्पल पर्रिकरांनी फारकाही बोलणं टाळलं. मागच्या पोटनिवडणुकीतही पक्षाने मला तिकीट नाकारलं, त्यावेळी मी नेतृत्वाचा सल्ला ऐकला आणि माघार घेतली. परंतू आता पणजीच्या जनतेच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचं उत्पल पर्रिकरांनी सांगितलं. त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व आता उत्पलच्या बंडावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT