लसीचा पहिला डोस चुकला तरी काळजी करु नका, Cowin वर अशी करा पुन्हा नोंदणी
मुंबई: कोरोनाच्या लसीकरणाबाबत सध्या बराच गोंधळ पाहायला मिळत आहे. एकीकडे लसींचा तुटवडा होत असताना दुसरीकडे इतरही अनेक अडचणी समोर येत आहेत. यातील एक समस्या अशी आहे की, लसीच्या पहिल्या डोससाठी कोविनवर आपण अपॉईटमेंट स्लॉट बुक केला पण काही कारणास्तव आपल्याला डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाता आलं नाही तर आपली नोंदणी रद्द होत असल्याचं समोर आलं […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोनाच्या लसीकरणाबाबत सध्या बराच गोंधळ पाहायला मिळत आहे. एकीकडे लसींचा तुटवडा होत असताना दुसरीकडे इतरही अनेक अडचणी समोर येत आहेत. यातील एक समस्या अशी आहे की, लसीच्या पहिल्या डोससाठी कोविनवर आपण अपॉईटमेंट स्लॉट बुक केला पण काही कारणास्तव आपल्याला डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाता आलं नाही तर आपली नोंदणी रद्द होत असल्याचं समोर आलं आहे. अशावेळी नेमकं काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, आता याबाबत सरकारने एक नवा नियम लागू केला आहे.
ADVERTISEMENT
जर काही कारणास्तव आपला पहिला डोस घेणं राहून गेलं तरी आपण आता नव्याने लसीकरणासाठी नोंदणी करुन पुन्हा पहिला डोस घेऊ शकता. तशी तरतूद आता कोविनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांचा पहिला डोस घेणं राहून गेलं असेल तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. फक्त त्यांना पहिल्या डोससाठी नव्याने नोंदणी करावी लागेल.
Maharashtra vs UP: उत्तर प्रदेशने लसीकरणात महाराष्ट्राला टाकलं मागे, यूपीने नेमकं केलं तरी काय?
हे वाचलं का?
ही नेमकी काय प्रक्रिया असेल हे आपण उदाहरणासकट पाहूयात:
समजा, एखाद्या व्यक्तीने सुरुवातीला लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी केली असेल आणि त्याने पहिल्या डोससाठी स्लॉटही बुक असेल पण त्याला काही कारणास्तव लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता आली नसेल तर त्या व्यक्तीने अजिबात घाबरुन जाण्याचं काम नाही. कारण आता यापुढे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरुन पुन्हा एकदा कोविनवर नोंदणी करुन पहिला डोस घेऊ शकते.
ADVERTISEMENT
म्हणजेच जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे असलेला मोबाइल क्रमांक देऊन कोविनवर पुन्हा एकदा स्वत:साठी पहिल्या डोसचा स्लॉट बुक करु शकतात.
ADVERTISEMENT
लसींचं एकूण उत्पादन 8 कोटी, मे अखेर मिळणार फक्त 5 कोटी; नेमकं गौडबंगाल काय?
CoWIN पोर्टल कसं करावं रजिस्ट्रेशन?
-
सगळ्यात आधी https://selfregistration.cowin.gov.in/ ओपन करा आणि इथे मोबाइल नंबर टाकून Get OTP वर क्लिक करा.
-
OTP प्राप्त झाल्यानंतर तो वेबसाइटवर भरा आणि ‘Verify’ वर क्लिक करा आणि ‘Register for Vaccination’ पेज वर आपलं फोटो ID प्रूफ, नाव, लिंग आणि जन्मतारीख ही सर्व माहिती भरा.
-
यानंतर आपल्याला अपॉईटमेंट शेड्यूल करण्याचा ऑप्शन मिळेल. आपण ज्या व्यक्तीसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या बाजूला ‘Schedule’बटणवर क्लिक करा.
-
यानंतर आपला पिन कोड टाका आणि Search वर क्लिक करा. यानंतर आपल्याला या पिन कोडशी निगडीत सेंटर दिसू लागतील.
-
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सेंटर, तारीख आणि वेळ यांची निवड करुन ‘Confirm’ वर क्लिक करायचं आहे. एक यूजर हा चार सदस्यांसाठी व्हॅक्सिनेशन बुक करु शकतो.
Free Vaccination: मोफत लसीकरणाच्या निर्णयातील 5 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे
आतापर्यंत सरकारच्या आरोग्य सेतू अॅप आणि उमंग अशा दोन अॅप्सवरुन COVID-19 लसीकरणासाठी अपॉइंटमेंट बुक करू शकत होते. या व्यतिरिक्त आपण आता थर्ड पार्टी अॅप्समध्ये उपलब्धता आणि स्लॉट अपॉईंटमेंटची माहिती देखील पाहू शकता. अलीकडेच सरकारने CoWIN अॅपसाठी पब्लिक API रिव्हाइज केलं आहे. ज्यामुळे पेटीएम आणि HealthifyMe सारख्या अॅप्सवर COVID-19 लस उपलब्धतेची माहिती सहजपणे मिळू शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT