What is S-400 Defence System: भारताचं हे आहे 'सुदर्शन चक्र', पाकला कळण्याआधीच खेळ होतो खल्लास.. खासियत तर विचारूच नका!
पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या सीमेनजीकच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू ठेवले आहेत. मात्र, त्यांचे हे हल्ले परतवून लावण्यास भारताचं सुदर्शन चक्र सक्षम आहे. ते नेमकं काय आहे जाणून घ्या सविस्तर...
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. अशात पाकिस्तानकडून भारतातील काही भागात हल्ल्याचे प्रयत्न झाले, जे भारतानं हाणून पाडले. भारतीय सैन्यानं पाकिस्तानची लाहोर येथील एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त केली आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टम्सनी मात्र पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. ज्यामध्ये S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने मोलाची भूमिका बजावली आहे. याचविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
S-400 का आहे भारताची ढाल?
एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स हाणून पाडले. भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई, भुजसह आणखी काही भागात पाककडून केले जाणारे हल्ले परतवून लावण्यात भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणा अर्थात एअर डिफेन्स सिस्टीम ढाल बनून उभी राहिली. यात प्रामुख्याने S-400 ट्रायम्फ सिस्टम्स, बराक-8 क्षेपणास्त्रे, आकाश आणि DRDO चे अँटीड्रोन ही चार अस्त्रं फार महत्त्वाची ठरलीत.
भारतानं आपलं हवाई संरक्षण यंत्रणा किती मजबूत आणि आक्रमक केली आहे हे पाकनं कुरापती केल्यानंतर आता समोर आलं आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून तिथल्या 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी हद्दीत हल्ला केला. लाहोरमधील चीनने पुरवलेल्या HQ-9 हवाई संरक्षण युनिटचा नाश केला आणि महत्त्वाच्या रडारसह पायाभूत सुविधांना नुकसान पोहोचवले.
हे ही वाचा>> भारतासमोर तोंडावर आपटलेल्या पाकिस्तानने आता कर्जासाठी हात पसरले, समोर आले स्पष्ट पुरावे
यानंतर पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील भारतीय लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करून तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यातील प्रत्येक क्षेपणास्त्र अडवण्यात आले किंवा निष्क्रिय करण्यात आले. पाकचं एकही क्षेपणास्त्र त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचले नाही. याचं कारण होतं भारताची प्रभावी एअर डिफेन्स सिस्टम.
यामध्ये S-400 ट्रायम्फ सिस्टम्स, बराक-8, आकाश आणि DRDO चे अँटीड्रोन तंत्रज्ञानाची कामगिरी फार मोलाची ठरली आणि हवाई ढाल तयार केली ज्यामुळं अनेकांचे जीव वाचले. यात सिस्टम्समुळे भारत केवळ बचाव करण्यावर थांबला नाही तर त्याने वेगाने आणि अचूकतेने प्रत्युत्तर देखील दिलं.
यातली पहिली सिस्टम जी आहे ती सर्वात महत्त्वाची ठरलेली एस 400. एस-400 हवाई संरक्षण प्रणालीने या 15 भारतीय शहरांवर हवाई हल्ले करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडला. या घटनेने S-400 हे भारताचे "सुदर्शन कवच" असल्याचे सिद्ध झालं.
ही सिस्टीम रशियाने तयार केली आहे. पाच S-400 ट्रायम्फ स्क्वॉड्रनसाठी ₹35,000 कोटींचा करार 2018 मध्ये झालेला आणि भारतानं ही सिस्टीम खरेदी केली. या करारात भारताने 5 युनिट S-400 मिसाईल सिस्टीम्स खरेदी केल्या. S-400 ही मोबाइल लाँग-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे. ही प्रणाली स्टेल्थ फाइटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV (ड्रोन) यांना लक्ष्य करू शकते.
हे ही वाचा>> जम्मू काश्मीरवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा!
यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात, ज्या 400 किमी अंतरावरील टार्गेटवर हल्ला करू शकतात. यात दोन स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत, ज्या 600 किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात. एकावेळी 80 हवाई टार्गेट्सवर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते. सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटांत फायरिंगसाठी तयार होते. तीन स्क्वॉड्रन आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर कार्यरत आहेत.
दुसरं आहे बराक-8. हे मध्यम-श्रेणीचं एक शस्त्रं आहे. हे जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. बराक 8 इस्रायल-निर्मित MF-STAR रडार प्रणाली आहे. जी एकाच वेळी 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंतच्या शेकडो हवाई लक्ष्यांचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. 2017 मध्ये इस्रायलसोबत 2.5 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. बराक-8 आता भटिंडासारख्या आघाडीच्या तळांचे सक्रियपणे रक्षण करतो.
यानंतर स्वदेशी आकाश क्षेपणास्त्र. आकाश हे पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असून त्याची रेंज 25 किमी आहे. आकाश सुपरसॉनिक वेगाने उडतो, हे 20 किमी उंचीवर पोहोचू शकते. DRDO नं विकसित केलेलं हे मजबूत स्वदेशी शस्त्र आहे.
मॅन पोर्टेबल काउंटर ड्रोन सिस्टम (MPCDS) हे 2024 मध्ये स्थापित केलेली एक सिस्टम आहे. ही सुद्धा फार ताकदवान आणि महत्त्वाची यंत्रणा आहे. याव्यतिरिक्त, इस्रायली-मूळचे हॅरोप ड्रोन, स्कॅल्प आणि हॅमर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या राफेल लढाऊ विमानांची भूमिका देखील महत्त्वाची ठरली आहे.