चोरीचा संशयातून बेदम मारहाण करत मुंबईतील तरुणाचा जीव घेतला! आईने थेट पोलिसात धाव घेतली अन्...

मुंबई तक

चोरीच्या संशयावरून काही कामगारांनी एका 26 वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याला ठार मारल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना 19 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे गोरेगावच्या सुभाष नगर येथील तीन डोंगरी परिसरात असलेल्या राज पथरोन नावाच्या बांधकामाधीन इमारतीत घडली.

ADVERTISEMENT

बेदम मारहाण करत मुंबईतील तरुणाचा जीव घेतला!
बेदम मारहाण करत मुंबईतील तरुणाचा जीव घेतला!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चोरीचा संशयातून बेदम मारहाण करत मुंबईतील तरुणाचा जीव घेतला!

point

मृताच्या आईने थेट पोलिसात धाव घेतली अन्...

Mumbai Crime: मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे, चोरीच्या संशयावरून काही कामगारांनी एका 26 वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याला ठार मारल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना 19 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे गोरेगावच्या सुभाष नगर येथील तीन डोंगरी परिसरात असलेल्या राज पथरोन नावाच्या बांधकामाधीन इमारतीत घडली. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.

रात्रभर घरी परतलाच नाही 

प्रकरणातील मृत तरुणाचं नाव हर्षल परमा असल्याची माहिती आहे. संबंधित तरुण त्याची आई सुवर्णा रामसिंग परमा आणि वडिलांसोबत गोरेगाव येथे राहत होता. सुवर्णाने या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावेळी, मृताच्या आईने सांगितलं की, 18 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास, तिचा मुलगा हर्षल हा दारू पिण्यासाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला, पण तो रात्रभर घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:45 वाजता गोरेगाव पोलीस तिच्या घरी पोहोचले आणि त्यांनी हर्षलला राज पथरोन बिल्डिंगमध्ये काही लोकांनी मारहाण केल्याची माहिती दिली. त्यानंतर, त्याला बेशुद्ध अवस्थेत ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

बिल्डिंगच्या वॉचमनने दिली माहिती  

ही बातमी ऐकल्यांनंतर सुवर्णा आणि तिचा पती रामसिंग घाबरले. त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की रात्री उशिरा काही लोक चोरी करण्यासाठी इमारतीत घुसले. त्यापैकी तिघे पळून गेले, परंतु एकाला कामगारांनी पकडलं आणि त्याला बेदम मारहाण केली. बिल्डिंगचा वॉचमन पप्पू दुधनाथ यादव याने पोलिसांना माहिती दिली की, ही घटना पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. तिसऱ्या मजल्यावर राहणारा कामगार वसंत कुमार प्रसाद आला आणि त्याने सांगितलं की चार चोर इमारतीत घुसले, त्यापैकी तिघे पळून गेले असून एकाला पकडण्यात आलं आहे. यादव वरच्या मजल्यावर गेल्यानंतर त्याला एक तरुण दोरीने बांधलेल्या अवस्थेत दिसला. त्या तरुणाने त्याचं नाव हर्षल परमा असल्याचं सांगितलं.

हे ही वाचा: 15 लाखांचा हुंडा घेऊन नव्या नवरीला घरी आणली! पण, 8 दिवसांनंतर... नवऱ्याची लव्ह हिस्ट्री समजली अन्...

पार्किंग क्षेत्रात बेशुद्ध अवस्थेत पडला होता 

यादव म्हणाला की, त्यावेळी कामगार सलमान खान हर्षलला बांबूच्या काठीने मारहाण करत होता आणि इस्मुल्ला खान त्याला लाथा-बुक्क्यांनी मारत होता. त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता कामगारांनी त्याला धमकावलं आणि या सगळ्यापासून दूर राहण्यास सांगितलं. या भीतीने यादव पुन्हा खाली आला. सकाळी जवळपास 7 वाजताच्या सुमारास तो पुन्हा वरच्या मजल्यावर गेला तेव्हा हर्षल पार्किंग क्षेत्रात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यादवने लगेच साइट सुपरवायझर प्रदीप मिश्रा यांना कळवलं आणि त्यांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp