आमदाराच्या प्रतिनिधीचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद! महिलेसोबत अश्लील डान्स अन्... व्हिडीओ व्हायरल
अयोध्या येथून राजकीय वातावरण तापवणारी एक बातमी समोर आली आहे. बऱ्याचदा राजकीय वादांमुळे चर्चेत असणारे अयोध्या जिल्ह्यातील रुदौली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामचंद्र यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आमदाराच्या प्रतिनिधीचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद!

महिलेसोबत अश्लील डान्स अन्...
Political News: अयोध्या येथून राजकीय वातावरण तापवणारी एक बातमी समोर आली आहे. बऱ्याचदा राजकीय वादांमुळे चर्चेत असणारे अयोध्या जिल्ह्यातील रुदौली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामचंद्र यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे त्यांचे प्रतिनिधी कृष्णा सागर पाल यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना दिसत आहे.
महिलेसोबत अश्लील नृत्य...
या व्हायरल व्हिडिओची चर्चा आता राजकीय वर्तुळातही होत असल्याचं दिसून येत आहे. एका व्हिडिओमध्ये आमदाराचा प्रतिनिधी महिलेसोबत अश्लील नृत्य करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो एका खोलीत बेडवर बसलेला दिसत आहे. खरंतर, तिथे बऱ्याच महिला उपस्थित होत्या आणि आमदारांचे प्रतिनिधी बिअर पिताना दिसत आहेत.
हे ही वाचा: MBBS डॉक्टरचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू! होणाऱ्या बायकोसोबत हॉटेलमध्ये थांबला अन्... पोलिसांचा तपास सुरू
पोस्ट हटवण्यासाठी धमकी दिली जात आहे
तसेच, ज्या अकाउंटवरून हे सर्व व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले गेले आहेत, त्याच अकाउंटवरून दुसऱ्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट देखील पोस्ट करण्यात आला आहे. त्यात आमदाराचे नाव पोस्टवरून तात्काळ काढून टाकण्याची आणि पोस्ट केलेला व्हिडिओ आणि फोटो हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबद्दल, त्या सोशल मीडिया यूजरने लिहिलं की, "माझ्यावर राजकीय नेत्यांकडून दबाव आणला जात आहे आणि पोस्ट हटवण्यासाठी धमकी दिली जात आहे."
हे ही वाचा: मुलगी संतापून माहेरी आली अन् मागोमाग पतीसुद्धा... सासूने जावयासोबत केला भयानक प्रकार! मुलीनेच आईविरुद्ध केली तक्रार
नेटकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कमेंट्स
त्यात असं देखील लिहिलं आहे की, "जर पोस्ट डिलीट केली नाही तर मला कायदेशीर कारवाईची धमकी दिली जात आहे." सोशल मीडियावर लोक या यूजरच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत असल्याचं दिसून येत आहे. सध्या या व्हिडिओंवर आमदार आणि त्यांच्या प्रतिनिधीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचं सांगण्यात येत आहे.