30 वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो; कोणत्या पक्षात प्रवेश करणार? रामराजेंनी स्पष्टच सांगितलं
Ramraje Naik Nimbalkar : 30 वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो; कोणत्या पक्षात प्रवेश करणार? रामराजेंनी स्पष्टच सांगितलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

30 वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो;

कोणत्या पक्षात प्रवेश करणार? रामराजेंनी स्पष्टच सांगितलं
Ramraje Naik Nimbalkar, सातारा : फलटण येथे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये पदवीधर नोंदणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याबाबत रामराजे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांनी फसवू नका, असा सल्ला दिला आहे. शिवाय यावेळी रामराजे निंबाळकर यांनी पक्ष बदलाबाबतही भाष्य केलं.
रामराजे निंबाळकर म्हणाले, मी बोलतो ते स्पष्ट बोलतो.मी ठरवेल कोणत्या पार्टीत जायचं ते.नाहीतर तुम्ही ठरवा कोणत्या पार्टीत जायचं. यावर आपण मतदान घेऊ.. बघू सर्वांचे एकमत होतंय का पाहू. कोणत्या पार्टीत जायचं हे माझं मी ठरवीन 30 वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो.. कोणीही अस्वस्थ होऊ नका. मला फसवायचा प्रयत्न केला तर सुट्टी देणार नाही. तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा, असा सल्लाही यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी मेळाव्यात आलेल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर हादरलं, भावजी घरी आलेला दिसताच मेहुण्याने डोक्यात पक्कड घातली, जागेवर संपवलं