अनैतिक संबंधात ठार वेडी झाली, नवऱ्याचा काटा काढण्यासाठी मैत्रिणीलाही सोबत घेतलं, निर्जनस्थळी नेलं अन्
Raigad crime : अनैतिक संबंधात ठार वेडी झाली, नवऱ्याचा काटा काढण्यासाठी मैत्रिणीलाही सोबत घेतलं, निर्जनस्थळी नेलं अन्
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अनैतिक संबंधात ठार वेडी झाली

नवऱ्याचा काटा काढण्यासाठी मैत्रिणीलाही सोबत घेतलं
Raigad crime :सध्या विवाहबाह्य संबंधांमुळे होत असलेल्या हत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. रायगड जिल्ह्यातील नागोठाणे भागातून असाच प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात ठार वेड्या झालेल्या एका महिलेने स्वत:च्या पतीच्या काटा काढण्याचा कटात सहभागी झाली. पतीची हत्या करण्यासाठी या महिलेने तिचा प्रियकर आणि मैत्रिणीची मदतही मिळावली.
अधिकची माहिती अशी की, मृतकाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23) असून, तो पाबळ तालुका, पेण येथील रहिवासी होता. त्याच्या पत्नीने उमेश सदु महाकाळ या व्यक्तीच्या आणि सुप्रिया चौधरी या मैत्रिणीच्या साहाय्याने त्याला ठार करण्याचा कट रचला. या घटनेनंतर नागोठाणे पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपासात समोर आले आहे की, दिपाली अशोक निरगुडे आणि उमेश यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. या नात्यामुळे पती कृष्णा अडचणीत पडत असल्याचे त्यांनी ठरवले. त्यामुळे त्यांनी कृष्णाला कायमचा दूर करण्याचा निर्णय घेतला आणि सुप्रिया चौधरीच्या मदतीने खून करण्याची योजना आखली.