तीन वर्षांच्या आजारी मुलीला तलावाजवळ सोडलं… मुलीचा दुर्दैवी मृत्यू! वडिलांविरोधात गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई तक

मुंबईतील ग्रँट रोड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध त्याच्या तीन वर्षांच्या मुलीवर उपचार करण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

मुलीला रुग्णालयात नेण्याऐवजी तलावाजवळ सोडलं…
मुलीला रुग्णालयात नेण्याऐवजी तलावाजवळ सोडलं…
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तीन वर्षांच्या आजारी मुलीला तलावाजवळ सोडलं…

point

पीडितेचा दुर्दैवी मृत्यू

point

वडिलांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Crime: मुंबईतील ग्रँट रोड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध त्याच्या तीन वर्षांच्या मुलीवर उपचार करण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडिलांच्या निष्काळजीपणामुळे पीडित मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी डीबी मार्ग पोलिस ठाण्याचे पीआय सागर टिळेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एडीआर कायद्यांतर्गत केलेल्या चौकशीनंतर या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव अमीना खान असं असून की ग्रँट रोड येथे तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती.

वडिलांनी मुलीच्या तब्येतीकडे दुलर्क्ष केलं  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीनाची आई सुमैया सुहान खान तिच्या दोन्ही मुलींना तिचा पतीकडे सोडून 7 जानेवारी रोजी अहमदाबादला गेली होती. 8 जानेवारी रोजी दुपारी सुहानने त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून सांगितलं की त्यांची धाकटी मुलगी अमीन जिन्यावरून खाली पडली आणि तिला शरीराच्या अंतर्गत दुखापत झाली. तिच्या मुलीला जखमी पाहून सुमैय्याने सुहानला जखमी मुलीला रुग्णालयात नेण्यास सांगितलं. परंतु, तिचं न ऐकता तिला रुग्णालयात नेलं नाही. पुन्हा दोन दिवसांनंतर 10 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता, अमीना बाथरूममध्ये बेशुद्ध पडल्याचं सुहानने आपल्या पत्नीला फोन करून सांगितलं. त्यावेळी सद्धा सुमैयाने तिच्या पतीला मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली, परंतु पतीने मुलीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा: मुंबई: मित्रांसोबत पार्टी, 15 वर्षांची तरुणी बिअर प्यायली... नंतर, थेट ICU मध्ये दाखल! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं  

पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीच्या हट्टामुळे सुहान खानने त्याची बेशुद्ध मुलगी आणि तिच्या मोठ्या मुलीला नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे त्याच्या सासरच्या घरी घेऊन जाण्यास तयार झाला आणि दोन्ही मुलींसह नवी मुंबईला निघाला. मात्र, त्या दोन्ही मुलींना त्याच्या सासरच्या घरी सोडण्याऐवजी, त्याने त्यांना कोपरखैरणे तलावाजवळ सोडून दिलं आणि घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, सुहान त्याच्या दोन मुलींना घरी घेऊन न आल्याने सुमैय्याच्या वडिलांना चिंता वाटू लागली आणि ते मुलींच्या शोधात घरातून बाहेर पडले.

हे ही वाचा: कोल्हापुरात वृद्ध दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, मृतदेह धरणाच्या पाण्याजवळ फरफटत नेला

पोलिसांचा निष्कर्ष  

त्यावेळी, त्यांना अमीना कोपरखैरणे तलावाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर, त्यांनी तिला वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात नेलं मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तसेच, अमीनाच्या मोठ्या बहिणीची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं जात आहे. अमीनाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याच्या रिपोर्ट्सवरून, सुहान खानने 8 ते 10 जानेवारी दरम्यान जाणूनबुजून त्याच्या जखमी मुलीला रुग्णालयात नेलं नसल्याचा डीबी मार्ग पोलिसांनी निष्कर्ष काढला आणि यामुळे अमीनाचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp