MBBS डॉक्टरचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू! होणाऱ्या बायकोसोबत हॉटेलमध्ये थांबला अन्... पोलिसांचा तपास सुरू
एका 28 वर्षीय डॉक्टरचा हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. डॉ. फुजैल हे चीनमधून MBBS चं पूर्ण केल्यानंतर लखनऊमध्ये राहून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया (MCI) परीक्षेची तयारी करत होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

MBBS डॉक्टरचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू!

होणाऱ्या बायकोसोबत हॉटेलमध्ये थांबला अन्...
Crime News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका 28 वर्षीय डॉक्टरचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. येथील मडियांव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भारत नगरच्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. सीतापूरच्या मिरदही टोला येथील रहिवासी असलेले डॉ. फुजैल हे चीनमधून MBBS चं पूर्ण केल्यानंतर लखनऊमध्ये राहून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया (MCI) परीक्षेची तयारी करत होते.
होणाऱ्या बायकोसोबत हॉटेलमध्ये थांबले होते
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. फुझैल त्यांच्या होणाऱ्या बायकोसोबत हॉटेलमध्ये थांबले होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने हॉटेल कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली आणि त्यांनंतर त्यांना तात्काळ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर सुद्धा त्यांचा जीव वाचला नाही.
फॉरेन्सिक रिपोर्ट्सची तपासणी
मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं परंतु तरुणाच्या मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. त्यामुळे, व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी जतन करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या महिलेची चौकशी सुरू केली आहे आणि सध्या, ते घटनेची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मृत्यूमागचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी पोलीस फॉरेन्सिक रिपोर्ट्सची तपासणी करत आहेत.
हे ही वाचा: मुलगी संतापून माहेरी आली अन् मागोमाग पतीसुद्धा... सासूने जावयासोबत केला भयानक प्रकार! मुलीनेच आईविरुद्ध केली तक्रार
मृताच्या कुटुंबियांचं म्हणणं
याबाबत डॉ. फुझैलचे काका हिलाल अख्तर म्हणाले की त्यांना त्यांच्या पुतण्याच्या मृत्यूची माहिती पोलिसांकडूनच मिळाली. ते म्हणाले, "फुझैल एक मेहनती आणि हुशार डॉक्टर होता. त्याचा अचानक मृत्यू झाल्याच्या बातमीवर विश्वास ठेवणं कठीण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी आमची इच्छा आहे." फुलैलचा मृत्यू संशयास्पद पद्धतीने झाल्याचं मृताच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.