अंड शाकाहारी की मांसाहारी? प्रेमानंद महाराजांनी सांगितलं उत्तर

मुंबई तक

Premanand Maharaj : अंड शाकाहारी की मांसाहारी? प्रेमानंद महाराजांनी सांगितलं उत्तर

ADVERTISEMENT

premanand maharaj
premanand maharaj
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंड शाकाहारी की मांसाहारी?

point

प्रेमानंद महाराजांनी सांगितलं उत्तर

Premanand Maharaj : अनेक वर्षांपासून "अंड शाकाहारी आहे की मांसाहारी?" या प्रश्नावर समाजात वाद सुरू आहे. काहीजण अंड शाकाहारी असल्याचा दावा करतात, तर काहीजण त्याला मांसाहारी मानतात. मात्र आता वृंदावनधामातील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराजांनी या विषयावर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं असून, त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

एका धार्मिक कार्यक्रमात भक्तांनी प्रेमानंद महाराजांना विचारलं , “महाराज, अंड शाकाहारी आहे की मांसाहारी?” या प्रश्नावर त्यांनी शांतपणे पण ठाम उत्तर दिलं. प्रेमानंद महाराज म्हणाले, “अंड हे प्राणीजन्य पदार्थ आहे. ते जरी काही वेळा 'अनफर्टिलाईज्ड' असलं तरी ते मुळात जीव निर्माण करू शकतं. ज्यातून जीव निर्माण होऊ शकतो, ते पदार्थ कधीही शाकाहारी असू शकत नाहीत.”

त्यांनी पुढे सांगितलं की, “शाकाहारी अन्न म्हणजे ते जे वनस्पतींपासून मिळतं आणि ज्यात कोणत्याही प्रकारचा प्राण्याचा जीव नसतो. अंड हे मांसाहारी श्रेणीतच येतं, कारण ते पक्ष्याच्या शरीरातून तयार होतं आणि त्याचं स्वरूप जैविकदृष्ट्या प्राणिजन्य असतं.”

हेही वाचा : कोल्हापुरात वृद्ध दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, मृतदेह धरणाच्या पाण्याजवळ फरफटत नेला

हे वाचलं का?

    follow whatsapp