सासू सोबत अनैतिक संबंध, अश्लील व्हिडीओही बनवले, जमीन विकण्यावरुन वाद; नंतर मोठं कांड
Crime News : सासू सोबत अनैतिक संबंध, अश्लील व्हिडीओही बनवले, जमीन विकण्यावरुन वाद; नंतर मोठं कांड
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सासू सोबत अनैतिक संबंध, अश्लील व्हिडीओही बनवले

जमीन विकण्यावरुन वाद; नंतर मोठं कांड
Crime News : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बिनौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जीवना गालियान या गावात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. प्रेम, विश्वासघात, धमकी आणि अखेरीस खून या सगळ्यांचं मिश्रण असलेल्या घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरलाय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात..
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मुजफ्फरनगर येथील सरोज नावाच्या महिलेने आपल्या मुली सोनियाचं लग्न सोनू सैनी या तरुणाशी केलं होतं. लग्नानंतर सरोजही मुलगी आणि जावयासोबत राहू लागली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं; परंतु काही काळानंतर सासू आणि जावई यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले.
पोलीस तपासात हे समोर आलं की सोनू आणि सरोज यांनी एकत्र काही अशोभनीय व्हिडीओ क्लीपही तयार केल्या होत्या. त्या काळात सोनूने सरोजच्या नावावर बिजनौर येथे एक जमिनीचा तुकडा घेतला होता. त्या जमिनीची सध्याची किंमत सुमारे वीस लाख रुपये आहे. मात्र, सोनू ती जमीन विकण्याचा प्रयत्न करत होता, पण सरोज आणि तिची मुलगी या दोघींनाही यास विरोध होता.
हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ, दुचाकी पाय ठेवून चिरडून टाकली; व्हिडीओ व्हायरल