7.5 कोटी कॅश, 2.5 किलो सोनं, महागड्या गाड्या; IPS अधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं, काळं साम्राज्य कसं उभा केलं?
DIG harcharan singh bhullar graft case : 7.5 कोटी कॅश, 2.5 किलो सोनं, महागड्या गाड्या; IPS अधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं, काळं साम्राज्य कसं उभा केलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

IPS अधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं

काळं साम्राज्य कसं उभा केलं?
DIG harcharan singh bhullar graft case : पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या रोपड रेंजचे डीआयजी हरचरणसिंग भुल्लर यांना सीबीआयने लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. या कारवाईनंतर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आणि त्यावेळी त्यांच्याकडे सापडलेल्या मालमत्तेमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. सीबीआयच्या टीमला त्यांच्या घरातून तब्बल 7.5 कोटी रुपये रोख, 2.5 किलो सोन्याचे दागिने, रोलेक्स आणि राडो अशा ब्रँडच्या 26 लक्झरी घड्याळ, चार बंदुका, 17 काडतुसे, 108 विदेशी दारूच्या बाटल्या, तसेच मर्सिडीज आणि ऑडी गाड्यांच्या चाव्या सापडल्या. याशिवाय 50 बेनामी मालमत्तांचे कागदपत्र आणि अनेक बँक खात्यांचे पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.
स्क्रॅप व्यापाऱ्याकडून 8 लाखांची लाच घेताना जाळ्यात अकडला
सीबीआयने ही कारवाई तेव्हा केली, जेव्हा डीआयजी भुल्लर मोहालीतील आपल्या कार्यालयात स्क्रॅप व्यापाऱ्याकडून 8 लाखांची लाच स्वीकारत होते. फतेहगड जिल्ह्यातील मंडी गोबिंदगढ येथील व्यापारी आकाश बत्ता यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका प्रकरणाची चौकशी थांबवण्यासाठी डीआयजीने दरमहा लाखो रुपये मागितले, असा आरोप त्यांनी केला होता.
तक्रारीची सत्यता तपासण्यासाठी सीबीआयने जाळं टाकलं. तपासात भुल्लर आणि त्यांच्या दलालामधील वॉट्सअॅप कॉल आणि संभाषणाचे पुरावे मिळाले. दहा दिवसांच्या निरीक्षणानंतर सीबीआयने गुरुवारी सापळा लावला आणि व्यापाऱ्याने 8 लाखांपैकी 5 लाख रुपयांची पहिला हप्ता दिल्यानंतर भुल्लर यांना रंगेहात पकडले.