दोन मुलांची आई दुसऱ्यांदा पतीला सोडून दीरासोबत गेली पळून! मात्र, जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळले अन् रुग्णालयात नेताच...
संबंधित ही घटना प्रेमसंबंधातून घडल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर, पीडित दीर आणि वहिनीमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. त्यांच्यातील प्रेमामुळेच दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दोन मुलांची आई पतीला सोडून दीरासोबत गेली पळून!

जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळले अन् रुग्णालयात नेताच..
Crime News: उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे दीर आणि वहिनीने मिळून विष प्राशन करत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यावेळी, दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संबंधित ही घटना प्रेमसंबंधातून घडल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर, पीडित दीर आणि वहिनीमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. त्यांच्यातील प्रेमामुळेच दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. सध्या, पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळले
संबंधित प्रकरण हे किरतपुर पोलीस स्टेशन हद्दीतील हुसैनपुर गावातील असल्याची माहिती आहे. सोमवारी (20 ऑक्टोबर) येथे राहणाऱ्या ललित सिंग आणि नात्याने त्याची वहिनी लागणाऱ्या आरती (35) नावाच्या महिलेने संशयास्पद परिस्थितीत विषारी पदार्थाचं सेवन केलं. त्यानंतर, दोघेही गावाजवळील एका जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळले. याबाबत माहिती मिळताच स्थानिकांकडून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
हे ही वाचा: "त्यावेळेस दोनदा मरता-मरता वाचलो", धनंजय मुंडे असं का म्हणाले?
कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
पीडित महिला आरतीला एक नऊ वर्षांची मुलगी आणि एक सात वर्षांचा मुलगा अशी दोन असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या, दोन्ही मुले त्यांच्या आईच्या आठवणीत खूप रडत आहेत. ललित आणि आरती बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते, अशी गावात चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ललित आणि आरती 10 ऑक्टोबर रोजी घरातून पळून गेले होते. त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला. त्यावेळी आरतीने तिच्या कुटुंबियांनी समजावल्यानंतर पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती पुन्हा घरी परतली.
हे ही वाचा: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ, दुचाकी पाय ठेवून चिरडून टाकली; व्हिडीओ व्हायरल
आयुष्य संपवण्याचा निर्णय
पण दिवाळीच्या दिवशी त्या दोघांनी एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. पीडित तरुण आणि महिलेची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांना उच्च रुग्णालयात रेफर केलं, परंतु उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा करत आहेत जेणेकरून दोघांनी कोणत्या विषारी पदार्थाचं सेवन केले होतं? हे स्पष्ट होईल. स्थानिकांच्या मते, मृत तरुण आणि महिला एकमेकांवर खूप प्रेम करत होते, मात्र समाज आणि कुटुंबियांच्या दबावामुळे ते एकमेकांसोबत राहू शकले नाहीत.