15 लाखांचा हुंडा घेऊन नव्या नवरीला घरी आणली! पण, 8 दिवसांनंतर... नवऱ्याची लव्ह हिस्ट्री समजली अन्...

मुंबई तक

लग्नाच्या आठ दिवसांनंतर तो त्याच्या नव्या पत्नीला काहीच न सांगता पळून गेला. पीडित पत्नीने आता तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

नवऱ्याची लव्ह हिस्ट्री समजली अन्...
नवऱ्याची लव्ह हिस्ट्री समजली अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

15 लाखांचा हुंडा घेऊन नव्या नवरीला घरी आणली!

point

पण, बायकोला नवऱ्याची लव्ह हिस्ट्री समजली अन्...

Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका तरुणाने आधीच लग्न झालेलं असताना सुद्धा दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नाच्या आठ दिवसांनंतर तो त्याच्या नव्या पत्नीला काहीच न सांगता पळून गेला. पीडित पत्नीने आता तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर आली आहे. यासंबंधी पत्नीने आरोप केला की, "माझ्या नवऱ्याचं चारित्र्य चांगलं नाही. त्याचे इतर अनेक महिलांशी प्रेमसंबंध आहेत. त्याने माझ्याकडून हुंडाही मागितला. पोलिसांनी त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी जेणेकरून तो कोणत्याही महिलेवर असा अन्याय करणार नाही, असं मला वाटतं.”

कुटुंबियांविरुद्ध गैरवर्तनाचा गंभीर आरोप  

हे प्रकरण मुबारकपूर येथील आयआयएम रोड परिसरातील आहे. येथील रहिवासी असलेल्या अंकिता श्रीवास्तव हिने तिचा पती मनीष कमल आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध गैरवर्तनाचा गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. तिने आरोप केला की तिच्या पतीने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं. त्यानंतर लग्नाच्या आठ दिवसांनीच तो तिला सोडून गेला. अंकिताने तिच्या पती आणि सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

15 लाख रुपये हुंडा  

पोलिसांच्या माहितीनुसार, अंकिताने तिच्या तक्रारीत म्हटलं की, तिचं लग्न 7 मार्च 2025 रोजी डेहराडूनच्या टर्नर रोड येथील रहिवासी मनीष कमलसोबत झालं होतं. मनीष मूळचा गाजीपूर जिल्ह्यातील मंडी अकबराबाद रायगंज येथील रहिवासी आहे. अंकिताच्या कुटुंबियांनी हुंडा म्हणून मनीषच्या कुटुंबियांना 15 लाख रुपये रोख दिले आणि लग्नासाठी एकूण 35 लाख रुपये खर्च केले.

हे ही वाचा: कंपनीकडून दिवाळीसाठी केवळ 1,100 रुपये बोनस! संतप्त कर्मचाऱ्यांनी टोल उघडला अन् 10 हजार गाड्या फ्री मध्येच...

अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध 

लग्नानंतर, अंकिता गाजीपूर येथील तिच्या सासरच्या घरी गेली. परंतु, तिची सासू मीरा श्रीवास्तव, सासरे आणि मेहुणी हुंड्यासाठी तिचा छळ करू लागले. अंकिताने तक्रार दाखल करताना सांगितलं की, तिच्या सासरच्यांनी हुंड्याव्यतिरिक्त आणखी 10 लाख रुपयांची मागणी केली आणि यासाठी नकार दिला असता अंकिताला धमकावण्यात आलं आणि तिला मारहाण देखील करण्यात आली. इतकेच नव्हे तर, लग्नाच्या आठव्या दिवशी मनीष तिला सोडून गेला. त्यानंतर अंकिताला कळलं की मनीषने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तिच्याशी दुसरं लग्न केलं आहे. डेहराडूनला आल्यानंतर अंकिताला समजलं की मनीषचे इतर अनेक महिलांसोबत प्रेमसंबंध आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp