दुहेरी हत्याकांडाने चाकण हादरलं ! मालकाच्या मुलीला पळवून नेल्याच्या रागातून कामगारांची हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्याच्या चाकण परिसरातील करंजविहीरे गावात दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून या हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रियकर आणि त्याच्या मित्राला लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या वडिलांसह ६ जणांना ताब्यात घेतलं आहे. बाळु सीताराम गावडे आणि राहुल गावडे असं मयत कामगारांचं नाव आहे. बाळु ज्या वीटभट्टीवर काम करत होता, त्या भट्टीच्या मालकाच्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. यानंतर बाळुने आपला मित्र राहुलच्या मदतीने मुलीला पळवून नेल्यामुळे मालक नाराज झाला होता. यानंतर मालकाने दोघांनाही आपल्या हॉटेलवर बोलावून बेदम मारहाण केली, ज्यात दोघांचाही मृत्यू झाला.

काय आहे नेमकं प्रकरण?

हे वाचलं का?

बाळू गावडे आणि राहुल गावडे हे दोघे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आसखेड गावचे रहिवासी होते. दोघेही चाकणजवळच्या करंजविहिरे गावात एका वीटभट्टीवर कामाला होते. या वीटभट्टी मालकाचं हॉटेलही आहे. या वीटभट्टी मालकाच्या मुलीसोबत बाळूचं प्रेमप्रकरण जुळलं होतं. या प्रेमप्रकरणाला साहजिकच मुलीच्या घरातून विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.

पुरंदर तालुक्यात कुख्यात गुंड गणेश रासकरवर गोळीबार, जागेवरच मृत्यू

ADVERTISEMENT

बाळुला पळून जाण्यासाठी त्याचा मित्र राहुल गावडेने मदत केली. आपली मुलगी कामगारासोबत पळून गेल्यामुळं संतापलेल्या मालकाने राहुल आणि बाळुला शोधून काढलं. बाळूसोबत मालकाची मुलगीही होती. त्यांनी राहुल आणि बाळू यांना त्यांच्या हॉटेलवर आणून बेदम मारहाण केली. लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. यावेळी मुलीलाही मारहाण झाली आहे. तिलाही दुखापत झाल्याने ती जखमी आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT