कोरोनावरील औषधांमुळे होणारा म्युकोरमायकोसिस आजार का ठरतोय घातक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झालेले रुग्ण हे बरे झाल्यानंतर आता एका नव्याच आजाराशी झुंज देत आहेत. या आजाराचं नाव आहे म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) या ब्लॅक फंगस. यामध्ये रुग्णाची दृष्टी जाण्याचा सुद्धा धोका असतो. एवढंच नव्हे तर यामध्ये जीव देखील जाऊ शकतो. आतापर्यंत महाराष्ट्रात म्युकोरमायकोसिसमुळे जवळजवळ 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसंच गुजरातमध्ये देखील याच आजाराने अनेकांनी आपले प्राण गमावले असल्याचं समजतं आहे. खरं तर या लोकांनी कोरोनावर मात केली होती पण ते ब्लॅक फंगलच्या विळख्यात अडकले.

ADVERTISEMENT

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, म्युकोरामायसिसचे प्रकार वाढत आहेत. राज्यातील विविध भागात आतापर्यंत 200 जणांमध्ये म्युकोरामायसिस आढळून आला असून त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गापासून यांचा बचाव झाला होता मात्र ब्लॅक फंगसने त्यांच्या कमी झालेल्या रोग प्रतिकारक शक्तीवर आघात केला आणि तोच त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.

धक्कादायक ! लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही मुंबई पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

हे वाचलं का?

म्युकोरामायसिस म्हणजेच ब्लॅक फंगलची लागण नेमकी कशामुळे होत आहेत?

डॉ. लहाने यांचं म्हणणं आहे की, फंगल इंफेक्शन हे जुनंच आहे. पण कोरोनामुळे याचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जे स्टेरॉईड वापरले जात आहेत त्यामुळे रुग्णांची शुगर लेव्हल (रक्तातील साखर) वाढते. या व्यतिरिक्त काही औषधे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी करतात. अशावेळी रुग्णांना सहजपणे फंगल इंफेक्शन होतं. ब्लॅक फंगस हे थेट संक्रमित व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचतं. अशा परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू होतो. काही केसेसमध्ये रुग्णाला वाचवण्यासाठी त्याचे डोळे कायमचे काढून टाकावे लागतात.

ADVERTISEMENT

नीती आयोगाशी संबंधित डॉक्टर व्ही के पॉल म्हणतात, सामान्य परिस्थितीत मधुमेह असणाऱ्या रूग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस आढळून येतं. परंतु जर कोणाची शुगर लेव्हल नियंत्रणात नसेल आणि त्याला कोरोनाची बाधा झाली तर धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत उपचारासाठी बहुधा स्टेरॉइड्स वापरल्या जातात.

ADVERTISEMENT

Corona virus : सुप्रीम कोर्टाने केली 12 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना

सूरतमधील किरण हॉस्पिटलचे कान आणि घसा तज्ज्ञ डॉ. भाविन पटेल यांनी ‘आज तक’शी बोलताना असं म्हटलं की, ‘कोरोनाच्या दुसर्‍या लाटेममध्ये म्युकोरमायकोसिसचे रुग्ण हे अधिक प्रमाणात आढळून आलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर, रुग्ण डोळे दुखणे, डोकेदुखी इकडे दुर्लक्ष करतात. पण हेच दुर्लक्ष करणं हे रुग्णांसाठी आता धोकादायक ठरत असल्याचं दिसून आलं आहे.’

I-CARD, RT-PCR रिपोर्ट नसेल तरीही रूग्णाला रूग्णालयात दाखल करून घ्यावं लागणार

दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाची जी पहिली लाट आली होती तेव्हा देखील गुजरातमध्ये म्युकोरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगसचं संसर्ग आढळून आला होता. त्यावेळी याचे सर्वाधिक रुग्ण हे अहमदाबादमध्ये आढळून आले होते. त्यानंतर बडोद्यात देखील अशाच प्रकारचे रुग्ण आढळून आले होते. अहमदाबादमध्ये 44 आणि बडोद्यात 7 रुग्ण सापडले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT