‘इंदिरा गांधींसारखी किंमत मोजावी लागेल’, अमित शाहांना धमकी देणारा Amritpal सिंग कोण?
26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर खालसा पंथ ध्वज फडकावल्यामुळे अभिनेता दीप सिद्धू प्रसिद्धीच्या झोतात आला. दीप सिद्धूने सप्टेंबर 2021 मध्ये ‘वारीस पंजाब दे’ संस्था स्थापन केली. पण, 15 फेब्रुवारी 2022 रोजी अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 29 वर्षीय अमृतपाल सिंग दुबईतील वाहतूक व्यवसाय सोडून भारतात आला. त्याने या संस्थेची सूत्रं हाती घेतली. अमृतपालने त्याचा आदर्श […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर खालसा पंथ ध्वज फडकावल्यामुळे अभिनेता दीप सिद्धू प्रसिद्धीच्या झोतात आला.
हे वाचलं का?
दीप सिद्धूने सप्टेंबर 2021 मध्ये ‘वारीस पंजाब दे’ संस्था स्थापन केली. पण, 15 फेब्रुवारी 2022 रोजी अपघातात मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
त्यानंतर 29 वर्षीय अमृतपाल सिंग दुबईतील वाहतूक व्यवसाय सोडून भारतात आला. त्याने या संस्थेची सूत्रं हाती घेतली.
ADVERTISEMENT
अमृतपालने त्याचा आदर्श खलिस्तानी जर्नेल सिंह भिंद्रनवाले असल्याचं सांगितलं, तसंच आपण भिंद्रनवालेच्या पायाची धूळही नसल्याचं तो म्हणाला.
अमृतपालने अजनाळा पोलीस ठाण्याला घेराव करून तात्काळ एफआयआर मागे घेण्याची धमकी दिली होती.
‘आम्ही काहीही करू शकत नाही असे जर वाटत असेल, तर हे आमच्या ताकदीचे प्रदर्शन आहे, जे आवश्यक होते’, असं अमृतपाल म्हणाला.
यावर अमृतसरचे एसएसपी म्हणाले, ‘अमृतपालने पुरावे दिले आहेत. लवप्रीत उर्फ तुफान सिंग दोषी नसल्याचं समोर आलं आहे. त्याला सोडणार आहे.’
पण, याच दरम्यान अमृतपालने गृहमंत्री अमित शाहांना धमकी दिली.
“इंदिरा गांधींनी खलिस्तानी चळवळ रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली.”
“तुम्ही असं केलं, तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल”, असं अमृतपालसिंग म्हणाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT