‘…मग जिल्हा मागास का ठेवला?’ तानाजी सावंतांनी भाजप आमदारावरच केली टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Osmanabad district Politics : उस्मानाबाद : जिल्ह्यात सध्या भाजपचे आमदार (BJP MLA Rana Jagjeetsinha Patil) राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना पक्षाचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांच्यात जोरदार मतभेद पाहायला मिळत आहेत. तानाजी सावंतांनी तर थेट नाव न घेता राणा पाटलांवर निशाणा साधला आहे. (Tanaji sawant target on rana patil) पालकमंत्री सावंतांनी राणा पाटलांचं नाव न घेता मागासलेपणावर जाहीर भाषणातून टीका केली. नुकतंच आमदार पाटील यांनी सावंतांच्या निधी वाटपातील असमानतेबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर आता सावंतांनी देखील अप्रत्यक्षरीत्या 30-40 वर्ष जिल्हा मागास का ठेवला, असा सवाल केला. Minister Tanaji Sawant criticized BJP MLA Rana Patil

भाजप-शिंदेंच्या आमदारात बिनसलं! राणा पाटलांनी केली थेट मंत्रालयात तक्रार

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रविवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याकार्यक्रमात तानाजी सावंत आपल्या भाषणादरम्यान म्हणाले, कोणाला काय वाटतंय, त्याला मी भीक घालत नाही. मला त्याचं काही देणे घेणे नाही. नुसतं बोलणं वेगळं असतं. गेली 30-40 वर्ष जिल्हा मागास ठेवला, सत्ता होती ना तुमच्याकडे त्यावेळी काय केले, असा प्रश्न सावंतांनी उपस्थित केला. मोठं व खोटं रेटून बोलायचं, जनतेची प्रगती होऊ द्यायची नाही. लोक माझ्या मागे राहतील की नाही? या भीतीमुळे प्रगती व विकास करायचं नाही, असे म्हणत सावंत यांनी टीका केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या कार्यक्रमापूर्वी सावंतांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना जवळ बोलावलं आणि खांद्यावर हात ठेवला. यासह दोघांना घेऊन घोषणा देखील दिल्या. त्यामुळं दिवसभर जिल्ह्यात चर्चाना उधाण आले होते. मात्र तानाजी सावंतांनी स्वतः याचा वेगळा अर्थ घेऊ नये असे स्पष्ट केले. मात्र खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील म्हणाले, जसं अर्जुनाला मास्याचा डोळा दिसायचा तसंच आम्हाला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे दिसतात. त्यांनी खांद्यावर हात का ठेवला हे त्यांनाच माहिती. अंधाऱ्या रात्री पडत्या पावसात परतलो, ते काय पक्ष सोडायला का, असं देखील म्हणत आमदार कैलास पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कोणाला जर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारायचं असेल तर त्यांनी खुशाल यावं, आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करू, असा टोमणा देखील आमदार कैलास पाटलांनी सावंतांना लगावला.

ADVERTISEMENT

मंत्री तानाजी सावंतांनी भर कार्यक्रमात असं का केलं? सर्वत्र चर्चा

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंसोबत यायचं असेल तर स्वागत आहे : खा. निंबाळकर

खासदार ओमराजे निंबाळकर यावर बोलताना म्हणाले, सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात शिंदे आणि भाजपत वाद सुरूय. कदाचित राणा पाटलांना संदेश द्यायचा असेल म्हणून सावंतांना आमचे हात हातात घ्यावेसे वाटले असतील. भाजप आमदार राणा पाटलांनी पालकमंत्री तानाजी सावंताची तक्रार केलीय, त्या घटनेचा संदर्भ आजच्या घटनेला असू शकतं, असं खासदार निंबाळकर म्हणाले. यासह उद्धव ठाकरेंसोबत येऊन कुणाला काम करायची इच्छा असेल तर त्यांचं स्वागत आहे, असं देखील ते म्हणाले. हा सगळं प्रकार आमदार राणाजगजितसिंह पाटील आपल्या डोळ्याने टिपत होते. त्यांनी यावर भाष्य करण्यास टाळलं.

राणा पाटलांनी काय केली होती तक्रार?

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. चार पैकी 1 भाजप, 2 बाळासाहेबांची शिवसेना आणि 1 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी आमदारांची संख्या आहे. 2022-2023 सालच्या जिल्हा वार्षिक योजनेचा असणारा संपूर्ण निधी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भूम-परांडा मतदारसंघासाठी प्रस्तावित करून घेतल्याचं समोर आलं आहे. त्या तुलनेत उस्मानाबाद, उमरगा आणि तुळजापूर मतदारसंघासाठी निधीचा विचार केला तर तो शून्य आहे. इतर तिन्ही मतदारसंघासाठी निधी न देता संपूर्ण 100 टक्के निधी पालकमंत्री तानाजी सावंतानी स्वतःच्या मतदारसंघात घेतल्याचा आरोप होत आहे. यांच्याबाबतीत निधीमध्ये असमानता आहे, अशी तक्रार आमदार राणा पाटील यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT