संजय राऊतांच्या संपत्तीवर ‘ईडी’ची टाच; दादरमधील फ्लॅटसह अलिबागमधील जमीन जप्त
पत्रा चाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीने आज शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेली अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर ईडीने आता खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली […]
ADVERTISEMENT

पत्रा चाळ जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीने आज शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेली अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर ईडीने आता खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. १,०३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळा प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. याच प्रकरणात आता ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील आठ ठिकाणची जमीन आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण?
गोरेगावमधील पत्रा चाळीच्या पुनर्विकासासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत करार केला होता. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी तीन हजारांहून अधिक फ्लॅट तयार करायचे होते. एकूण फ्लॅटपैकी ६७२ फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते, तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला मिळणार होते.









