समजा, वंदे मातरम् म्हटलं नाही तर गोळ्या घालणार की फासावर लटकवणार? वारिस पठाण यांचा सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्यात ‘हॅलो नव्हे- वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे आता सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोनवरील संवादाला सुरुवात करण्यापूर्वी हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावं लागणार आहे. या अभियानाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. याचा जीआर शनिवारी काढण्यात आला असून आज वर्ध्यातून या नव्या अभियानाला सुरुवात करण्यात आली.

ADVERTISEMENT

दरम्यान सरकारच्या या निर्णयावर एमआयएम नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले वारिस पठाण?

वारिस पठाण म्हणाले, भाजपजवळ काही मुद्देच शिल्लक राहिलेले नाहीत. कधी शहरांची नावं बदलायची तर कधी वंदे मातरम म्हणायला लावायचं. पण ही सगळी बेरोजगारी म्हणजे केवळ महागाईवरून लक्ष वळवण्याचे नाटकं आहेत. या निर्णयामुळे बेरोजगारी दुर होणार आहे का? महागाई कमी होणार आहे का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का?

हे वाचलं का?

अभियानाची सुरुवात पण हे कोणत्या दिवशी करत आहेत, तर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिवशी. जे महात्मा गांधी फादर ऑफ नेशन आहेत, त्यांना नथुराम गोडसेने मारले. तो देशाचा पहिला दहशतवादी होता, त्याची तर हे सगळे पुजा करतात. गोडसे मुर्दाबाद हे तर त्यांच्या तोंडून कधी येणार नाही. फक्त अशा काही तरी मुद्द्यांवर लक्ष बाजूला करायचं आणि द्वेषाचे पसरवायचा हेच यांचे राजकारण आहे, असा हल्लाबोल पठाण यांनी केला.

समजा जर कोणी वंदे मातरम् म्हणाले नाही तर ते काय करायचे? गोळी मारणार का? त्याच्यावर गुन्हा दाखल करणार? त्याला तुरुंगात टाकणार की त्याला फासावर लटकवणार? हेही भाजपच्या नेत्यांना सांगावे लागेल. संविधानाने वंदे मातरम म्हणायला सांगितले आहे का? असाही सवाल पठाण यांनी उपस्थित केला. बेरोजगारी, महागाईवर कोणी त्यांच्याशी बोलले तर ते चित्त्यापेक्षा वेगाने पळून जातील, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT